एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी: महागाई भत्त्यात होणार वाढ; 90 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार लाभ, मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी: महागाई भत्त्यात होणार वाढ; 90 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार लाभ, मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता


मुंबई35 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

Advertisement

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून वाढवून 38 टक्के इतका करण्याचा निर्णय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे 90 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तर राज्य सरकारवर 9 कोटींचा बोजा पडणार आहे.

त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 203 टक्क्यांवरून वाढवून 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.राज्य परिवरन मंहामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनासाठी सरकारकडून अर्थसहाय्य देण्यात येतं. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानं त्याचा आर्थिक भार हा राज्याच्या तिजोरीवर येणार आहे. 4 टक्के वाढ झाल्याने राज्य सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल. याशिवाय असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहरन कर्मचाऱ्यांना 203 टक्क्यांवरून 212 टक्के इतका महागाई भत्ता देण्यात येणार आहे.

Advertisement

यापूर्वी जून महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. या संदर्भात जून महिन्यात राज्य सरकारने निर्णय जाहीर करत महागाई भत्ता वाढवण्याचं जाहीर केले होते.Source link

Advertisement