एव्हिन लुईसने १९ व्या षटकात शिवम दुबेला तब्बल २५ धावा चोपून गेलेला सामना लखनौच्या पारड्यात टाकला. लखनौने चेन्नईचा सहा विकेट्सनी पराभव करत हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. लुईसने २३ चेंडूत अर्धशतक ठोकले. रवी बिश्नोईने २४ धावा देत २ विकेट घेतल्या. एव्हिन लुईसने २५ चेंडूत ५५ धावा केले त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या २११ धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंटने दमदार सुरूवात केली. लखनौचे सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल यांनी १० षटकात ९९ धावांची सलामी दिली. हे दोघे मैदानावर असताना लखनौ सामना बिनबादच जिंकते की काय असे वाटत होते.
मात्र १० षटकानंतर सीएसकेच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. प्रेटोरियसने ४० धावा करणाऱ्या राहुलला बाद करत सलामी जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या मनिष पांडेला तुषार देशपांडेने अवघ्या ५धावांवर बाद करत लखनौला दुसरा धक्का दिला. त्यानंतर प्रेटोरियसने पुन्हा एकदा सेट फलंदाज गळाला लावला. त्याने ४५ चेंडूत ६१ धावा चोपणाऱ्या क्विंटन डिकॉकची बॅट शांत केली. मात्र लखनौच्या एव्हिन लुईस आणि दीपक हुड्डाने आपला आक्रमक बाणा कायम ठेवला. मात्र धावांचे आणि चेंडूतील अंतर वाढत चालले होते. त्यातच दीपक हुड्डा ब्रोव्होच्या गोलंदाजीवर बाद झाला.
मात्र लुईसने एकहाती किल्ला लढवत १९ व्या षटकात तब्बल २५ धावा चोपल्या. लुईसने २३ चेंडूत अर्धशतक ठोकून हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्यानंतर ६ चेंडूत ९धावांची गरज असताना लखनऊ सुपर जायंटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत मोठ्या धावसंख्येचा पाया घातला. सलामीवीर रॉबिन उथप्पाने २७ चेंडूत ५० धावा चोपल्या. त्यानंतर मोईन अलीने ३५ तर शिवम दुबेने ४९ धावांची खेळी करत सीएसकेला १५०च्या पार पोहचवले. त्यानंतर आलेल्या कर्णधार रविंद्र जडेजा आणि एमएस धोनीने स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी केली आणि संघाला २०० चा टप्पा पार करून दिला. धोनीने ६ चेंडूत १६ धावा चोपल्या तर रविंद्र जडेजाने ९ चेंडूत १७ धावा केल्या. लखनऊकडून आवेश खान, अँड्र्यू टाय आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.