एमसीए क्रिकेट स्पर्धा: डेक्कन जिमखान्याचा हिंगोलवर डावासह 255 धावांनी विजय, पियुष साळवीची अष्टपैलू कामगिरी


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघाने विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत डेक्कनने हिंगोली संघावर डाव व २५५ धावांनी मोठा विजय मिळवला. या लढतीत अष्टपैलू पियुष साळवी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Advertisement

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डेक्कनने पहिल्या डावात ७०.४ षटकांत ३८४ धावा उभारल्या. यात संघाच्या एका फलंदाजाने शतक व तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. सलामीवीर तुषार श्रीवास्तने १० व अर्थव वरनने १९ धावा केल्या. दुसरा सलामवीर तथा कर्णधार धीरज फटांगडेने अर्धशतक झळकावले. त्याने ४४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार खेचत ५५ धावांची खेळी केली.

स्वप्निल फुलफगारने ५६ चेंडूंत ३६ धावा काढल्या. मधल्या फळीतील अजय बोरुडेने शतक ठोकले. त्याने ९० चेंडूंत ११ सणसणीत चौकार व ६ उत्तुंग षटकार खेचत १०० धावा काढल्या. दीपक डांगीने ६९ धावांचे योगदान दिले. ए. पोरेने ५६ धावांची खेळी केली. हिंगोलीच्या सनी पंडीतने १२९ धावा देत ५ गडी बाद केले. अभिनव कांबळेने ३ व विकासने २ बळी घेतले.

Advertisement

हिंगोलीचा डाव गडगडला

प्रत्युत्तरात पहिल्या डावात हिंगोलचा डाव अवघ्या ४८ धावांवर ढेपाळला. संघ ३३६ धावा मागे पडला. यात राहुल देशमुखच्या १४ धावा वगळात इतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. त्यांचे चार फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. डेक्कनच्या पियुष साळवीने १८ धावा देत ४ आणि दीपक डांगीने १४ धावा देत ४ गडी बाद केले.

Advertisement

पियुषने केले अर्धा डजन फलंदाज बाद

फॉलोऑन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हिंगोलीचा डाव अवघ्या ८१ धावांवर संपुष्टात आला. संघाचा २५५ धावांनी पराभव झाला. यात सॅडी पाटीलने १३, विराज जमदाडेने ४० व हर्ष सिंगने १२ धावा केल्या. डेक्कनच्या पियुष साळवीने ३० धावा देत ६ फलंदाजांना तंबूत पाठवले. दीपक डांगीने ३ गडी बाद केले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement