औरंगाबाद3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १६ वर्षाखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत कर्णधार राम राठोडच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यजमान छत्रपती संभाजीनगरने सर्वबाद १९५ धावा उभारल्या. गरवारे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात पहिल्या दिवस अखेर चंद्रोस संघाने ३६.४ षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. संघ अद्याप ५७ धावा पिछाडीवर आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना छत्रपती संभाजीनगरकडून सलामीवीर राघव नाईकने २६ व रुद्राक्ष बोडखेने २२ धावा काढल्या. कर्णधार राम राठोडने ३३ चेंडूंत ३ चौकार खेचत सर्वाधिक ३७ धावा केल्या. त्याला सुदेशने पायचित केले. जय जाधवने ५३ चेंडूंत ५ चौकार मारत ३१ धावा जोडल्या. अरेझ खानने ४८ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. तळातील फलंदाज श्रेयस जोशीने २० धावा करत संघाला २०० धावांच्या जवळ नेले. चंद्रोसकडून कर्णधार अनिकेत कुडुकने ५७ धावा देत ५ गडी बाद केले. अर्जुन गोडसेने २ आणि रणजित गौतम व सुदेशने प्रत्येकी एकाला टिपले.
अनिकेतचे अर्धशतक :
पहिल्या डावात कर्णधार अनिकेत कुडुकने अर्धशतकी खेळी करत चंद्रोसचा डाव सावरला. सलामीवीर अर्जुन शेळके १ व दीप पाटली शुन्यावर बाद झाले. प्रथमेश वाघमारेने ६१ चेंडूंत २३ धावा केल्या. अनिकेतने ७७ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार मारत सर्वाधिक ७३ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला पुष्कार जोशीने अर्थव तोतलाच्या हाती झेल बाद केले. रणजित गौतम १५ धावांवर खेळत आहे. अर्जुन गोडसे १४ धावांवर तंबूत परतला. यजमान संघाकडून राम राठोडने २५ धावा देत ३ गडी बाद केले. अर्थव तोतला व पुष्कार जोशीने प्रत्येकी एक गडी टिपला.