औरंगाबाद9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १६ वर्षाखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी यजमान छत्रपती संभाजीनगरचा पहिला डाव ४८.१ षटकांत ११८ धावांवर ढेपाळला. गरवारे स्टेडियवर सुरू असलेल्या दोन दिवसीय सामन्यात पहिल्या दिवस अखेर टेनिटी संघाने ४० षटकांत ३ बाद ११४ धावा करत सामन्यात वर्चस्व राखले. पहिल्या डावात आघाडीसाठी त्यांना केवळ ४ धावांची गरज आहे.
प्रथम फलंदाजी करताना छत्रपती संभाजीनगरकडून केवळ दोनच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठता आली. इतर फलंदाजांनी निराशा केली. सलामीवीर राघव नाईकने ९१ चेंडूंत ६ चौकार खेचत सर्वाधिक ३९ धावा काढल्या. दुसरा सलामीवीर रुद्राक्ष बाडखेने ६६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. रुद्राक्ष व राघव जोडीने पहिल्या गड्यासाठी ५६ धावांची अर्धशतकी भागीदारी करत चांगली सुरूवात करुन दिली. मात्र त्यानंतर संघाचा डाव घसरला. प्रेम पवारच्या १७ धावा सोडता एकही फलंदाज दहा धावाही करु शकला नाही. कर्णधार राम राठोड ९ धावांवर परतला. ट्रेनिटीकडून अद्वैत डेरेने २४ धावा देत ६ फलंदाजाना टिपले. ईश्वर राठोड व रोनीने प्रत्येकी २ गडी बाद केले.
यशच्या ३३ धावा
ट्रेनिटीची सुरूवात खराब झाली. सलामीवीर तथा कर्णधार ध्रुव कामत अवघ्या ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र आघाडीच्या फलंदाजांनी लगेच संघाचा डाव सावरला. दुसरा सलामीवीर संगम कांबळेने ७२ चेंडूंत ४ चौकारांसह २६ धावा केल्या. राजवीर देशमुखने ५२ चेंडूंत ६ चौकार लगावत ३३ धावा काढल्या. यश जाभुंळकर नाबाद ३३ धावांवर खेळत आहे. शिवलिंग नाबाद ५ धावांवर मैदानात आहे. राम राठोडने एक बळी घेतला.