एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षा पात्रतेच्या अटी व परीक्षा योजना  || रोहिणी शहा

  Advertisement

  कोविड कालावधीमध्ये परीक्षांचे आयोजन न झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार अशा वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या उमेदवारांच्या अर्जांची छाननी इत्यादी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना प्रवेशपत्रे निर्गमित करण्याचा कालावधी लक्षात घेऊन २ जानेवारी रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही २३ जानेवारी रोजी होत आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात दुय्यम सेवा मुख्य परीक्षा होणार आहे.

  सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, वित्त विभागा अंतर्गत राज्य कर निरीक्षक आणि गृह विभागा अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक या गट ब (अराजपत्रित) सेवांमधील एकूण ६६६ पदांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट ब – अराजपत्रित) संयुक्त पूर्वपरीक्षा २६ फेब्रुवारी रोजी प्रस्तावित आहे. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी प्रस्तावित वेळापत्रकानुसारच परीक्षा होईल हे गृहीत धरून तयारीचे नियोजन केले पाहिजे.

  Advertisement

  परीक्षेचे स्वरूप, अर्हता आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

  शैक्षणिक अर्हता:

  Advertisement

  मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अर्हता.

  मराठीचे ज्ञान आवश्यक. 

  Advertisement

  मागासवर्गीय तसेच अन्य प्रवर्गांसाठी शिथिल केलेली कमाल वयोमर्यादा ही केवळ त्या त्या प्रवर्गातील  Non Creamy Layer वर्गातील उमेदवारांसाठीच लागू होते. तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही  Non Creamy Layer ची अट लागू नाही.

  पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता शारीरिक अर्हता:

  Advertisement

  पुरुष उमेदवारांकरिता – उंची- १६५ सेंमी (किमान); छाती- न फुगविता ७९ सेंमी व फुगविण्याची क्षमता- किमान ५ सेंमी

  महिला उमेदवारांकरिता – उंची- १५७ सेंमी (किमान)

  Advertisement

  पूर्वपरीक्षा:

  वरील तीन पदांसाठी पूर्वपरीक्षेचा पेपर संयुक्त असला तरीही पुढील टप्प्यावर वेगवेगळे पेपर, अभ्यासक्रम आणि टप्पे विहीत केलेले आहेत. त्यामुळे दुय्यम सेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करतानाच उमेदवारांनी ते तीनपैकी कोणकोणत्या पदांसाठी परीक्षा देऊ इच्छितात ते नमूद करावे लागते.

  Advertisement

  परीक्षा शुल्क:

  खुला प्रवर्ग – रू. ३७४

  Advertisement

  अनूसूचित जाती, अनूसूचित जमाती (अन्य मागास प्रवर्गतील उन्नत व प्रगत गटात न मोडणा-या Non Creamy Layer  उमेदवारास) – रू. २७४

  पूर्वपरीक्षा स्वरूप:

  Advertisement

  तिन्ही पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे:

  गुणांकन

  Advertisement

  या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रित नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात व प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.

  पूर्वपरीक्षेमध्ये तिन्ही पदांसाठी एकच संयुक्त पेपर असला तरीही प्रत्येक पदासाठीच्या मुख्य परीक्षेसाठी पूर्वपरीक्षेचा निकाल स्वतंत्रपणे लागतो.

  Advertisement

  उमेदवारांचे गुण तेच असले तरी प्रत्येक

  पदासाठी उपलब्ध पदांची संख्या वेगळी असल्याने कट ऑफ वेगवेगळा लागू शकतो. आणि एकच उमेदवार एका पदासाठीच्या निकालामध्ये

  Advertisement

  उत्तीर्ण दुस-या पदाच्या निकालामध्ये अनुत्तीर्ण ठरू  शकतो.

  मुख्य परीक्षा  परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग – रु. ५२४

  Advertisement

  अनूसूचित जाती, अनूसूचित जमाती (अन्य मागास प्रवर्गतील उन्नत व प्रगत गटात न मोडणा-या ( Non Creamy Layer) उमेदवारास)  –

  रू. ३२४

  Advertisement

  मुख्य परीक्षेचे स्वरूप

  साहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या पदांसाठी मुख्य परिक्षेमध्ये ४०० गुणांच्या लेखी परीक्षेचा एकच टप्पा असतो.

  Advertisement

  पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ४०० गुणांच्या लेखी परीक्षेबरोबर शारीरीक चाचणी व मुलाखत असे दोन टप्पे जास्तीचे असतात. यातील शारीरीक चाचणी ही अर्हताकारी स्वरुपाची असते. म्हणजे १०० पैकी किमान ६० गुण मिळवणारा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतो आणि अंतिम गुणांमध्ये या गुणांचा समावेश करण्यात येत नाही. मुलाखत ४० गुणांसाठी घेण्यात येते आणि अंतिम निवडीसाठी लेखी परीक्षा व मुलाखतीचे गुण विचारात घेतले जातात.

  मुख्य परीक्षा लेखी परीक्षा स्वरूप :

  Advertisement

  संधींची मर्यादा व गणना

  आयोगाने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कमाल संधींची संख्या विहीत करुन सन २०२१ मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणा-या भरतीपासून उमेदवारांच्या संधींची गणना करण्यात येणार असल्याची घोषणा २०२० मध्ये केली आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्वपरीक्षा २०२१ पासून या परीक्षेच्या संधींची गणना सुरू होईल. 

  Advertisement

  या परीक्षेपासून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल सहा वेळा, मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ वेळा परीक्षा देता येईल. सदर कमाल संधींची मर्यादा अनूसूचित जाती व अनूसूचित जमातीच्या उमेदवारांना लागू नाही.

  The post एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षा पात्रतेच्या अटी व परीक्षा योजना appeared first on Loksatta.

  Advertisement  Source link

  Advertisement