एपीआय संभाजी गुरव यांची अभिमानास्पद कामगिरी: दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर केले पादाक्रांत

एपीआय संभाजी गुरव यांची अभिमानास्पद कामगिरी: दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर केले पादाक्रांत


पुणे25 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे पाेलिस विभागातील शीघ्र कृती दल विभागात कार्यरत सहाय्यक पाेलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी अ‌ॅडिज पर्वत रांगेतील दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना स्थित सर्वोच्च शिखर माऊंट अकानकागुआ (23 हजार फूट उंची) सर केले आहे. गुरव यांनी 23 मे 2021 राेजी जगातील सर्वाच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर जगातील सातही खंडातील सात सर्वाच्च शिखरे सर करण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यातील ही पाचवी माेहीम फत्ते झाली आहे.

Advertisement

शासकीय कर्तव्य करत असताना कामाचा व्याप सांभाळुन त्यांनी या माेहीमेची तयारी केली. मुंबई ते दुबई आणि दुबई ते रिओ द जनरिओ पुन्हा रिओ द जनरिओ ते बूनिस एअरस व शेवटी बुनस ते मेंडाेजा असा विमान प्रवास करत ते माेहीमेपर्यंत पाेहचले.

याबाबत गुरव म्हणाले, माऊंट अकानकागुआ हा पर्वत सध्याचे काळात माेठया प्रमाणात बर्फ वृष्टी झाल्याने अंगास बाेचणारी थंडी जाणवते. उणे 20 डिग्री पर्यंत असणारे तापमान तसेच सदरचा पर्वत हा दाेन्ही महासागरांच्या मध्ये असल्याने जाेरदार वारा असताे. या शिखराचा माथा हा 23 हजार फूट उंचीवर असल्याने सदर जागी ऑक्सिजन पातळी कमी असते. त्याचा सामनाही करावा लागताे.

Advertisement

बर्फ वृष्टी या भागात माेठ्या प्रमाणात हाेत असल्याने चांगले हवामान मिळाल्यानंतरच वैद्यकीय चाचणी करुनच गिर्याराेहकांना पुढील वाटचाल करता येते. 23 मे 2021 जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर जगातील सातही खंडांतील सातही सर्वोच्च शिखरे एका वर्षा मध्ये सर करण्याचा मानस केला परंतु कोरोनामुळे त्यात अडचणी आल्या. त्यानुसार 26 जुलै 2021 रोजी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस सर केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 2021 रोजी अफ्रिका खंडांतील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो शिखर सर केले. 29 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट कोजी अस्को शिखर सर केले आणि आता माझ्या या गिर्यारोहणाचा मोहिमेतील पाचवी मोहीम संपन्न झाला आहे.

या माेहीमेसाठी पाेलीस महासंचालक (प्र) संजय कुमार, पाेलीस आयुक्त रितेश कुमार, सहपाेलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पाेलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, पाेलीस उपायुक्त आर राजा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement