एनसीबीच्या अहवालानंतर कारवाई: समीर वानखेडेंच्या घरावर सीबीआयचा छापा; आयर्न खानच्या नातेवाईकांना लाच मागितल्याचे भोवले


मुंबई8 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. समीर वानखेडेंच्या घरी सीबीआयचा छापा; आयर्नखानच्या नातेवाईकांना लाच मागितल्याचे प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने अहवाल दिल्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचलले. यासह कार्डेलिया क्रूझ केसमध्ये लाच मागितल्याच्या प्रकरणी वानखेडेंसह इतरांवरही बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि इतरांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मुंबईतील परिसराची झडती घेण्यात आली. वानखेडे हे यापूर्वी एनसीबी (मुंबई झोन) प्रमुख होते आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या अटकेमुळे ते वादात सापडले होते.

Advertisement

क्रूज ड्रग्ज प्रकरणी चर्चेत

समीर वानखेडे एनसीबीमध्ये असताना त्यांनी शाहरुख खानच्या मुलाविरुद्ध ड्रग्ज प्रकरणाचा तपास केला होता. त्यावेळी ते एनसीबीचे प्रमुख होते. न्यायालयाने आर्यनला जामीन मंजूर केला आणि त्याच्यावरील ड्रग्जचा खटला मागे घेतला.

Advertisement

हे आहे प्रकरण

एनसीबीच्या दक्षता पथकाने केलेल्या तपासाच्या आधारे सीबीआयने कार्डेलिया क्रूझ प्रकरणात समीर वानखेडेच्या नावासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कार्डेलिया जहाज ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेसह 5 जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानच्या नातेवाईकांकडून एनसीबीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी खासगी व्यक्तीच्या मदतीने पैशांची मागणी केली होती. 50 लाखांची लाचेची मागणी केल्याची माहिती सीबीआयला प्राप्त झाली होती. यासह मुंबई, दिल्ली, कानपूर आणि रांचीमध्ये 29 ठिकाणी सीबीआयचे छापे पडत आहेत.

Advertisement

समीर वानखेडे यांनी चुकीच्या मार्गाने काम मिळवल्याचा आरोप आहे. समीर वानखेडे यांनी वय लपवून बारचा परवाना घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मलिकांनी केले होते आरोप

Advertisement

यापूर्वी माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा नवी मुंबईत बार असल्याचा आरोप केला होता. त्यासाठी त्यांना तरुण वयात परवाना मिळाला. नवी मुंबईतील हॉटेल सद्गुरु येथे बारचा परवाना घेतला तेव्हा वानखेडे १७ वर्षांचे होते, असा दावा मलिक यांनी केला होता.



Source link

Advertisement