एनआयएची टीम नागपुरात: गडकरी धमकी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन


नागपूर44 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा ऊर्फ शाकीरने गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली.

Advertisement

दहशतवादी कनेक्शन लक्षात घेता या प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. यासाठी एनआयएची टीम गुरुवारी नागपुरात दाखल झाली असून जयेश कांथा सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. एनआयए पथक त्याची कारागृहात जाऊन चौकशी करणार आहे.



Source link

Advertisement