एटीएसकडून चौकशी: डॉ. कुरुलकर यांच्याप्रमाणेच हवाई दलाचा अधिकारी हनी ट्रॅपसाठी लक्ष्य! चौकशीतून माहिती उघड


पुणे24 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कुरुलकर यांच्या संपर्कात असलेल्या महिलेने बेंगळुरु येथे हवाई दलात कार्यरत असलेल्या एका मराठी अधिकाऱ्यालाही देखील संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या कुरुलकर यांची एटीएसमार्फत चौकशी सुरू आहे.

Advertisement

बंगळुरू येथील एअर फोर्सचे अधिकारी निखिल शेंडे यांना देखील डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या प्रमाणे पाकिस्तानी आयपी ऍड्रेस वरून हनी ट्रॅप सारखा कॉल आला होता. ज्या नंबरने कुरुलकर यांना कॉल आला होता. त्याच नंबरने निखिल शेंडे यांना देखील कॉल आल्याची बाब तपासात समोर आली आहे. त्यामुळे निखिल शेंडे यांचा देखील जवाब घेण्यात आला असून एअर फोर्सच्या चौकशी समितीकडून त्यांची चौकशी केली जात आहे.

याबाबत शेंडे यांचा सीआरपीसी 164 प्रमाणे न्यायालयासमोर कबुली जबाब नोंदविण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथक तर्फे डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ केली आहे. याबाबतचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्र. पु. जाधव यांनी दिला आहे.

Advertisement

पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) चे संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप असल्याने त्यांना एटीएसकडून अटक करण्यात आलेली आहे.कुरुलकर यांना अटक केल्यानंतर त्यांना आत्तापर्यंत १३ दिवसांची एटीएस कोठडी देण्यात आली. कुरुलकर यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना अजून एक दिवसाची एटीएस कोठडी देण्यात आली आहे.

कुरुलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी सरकारी वकील चंद्रशेखर साळवे यांनी न्यायालयात सांगितल की, कुरुलकर यांच्या कडे 4 ते 5 मोबाईल फोन होते.त्यातील 6 टी हा मोबाईल फोन जो फॉरेन्सिक तपासणीसाठी देण्यात आलं होता.आणि त्याच तपास करण्यासाठी सोमवारी कुरुलकर यांनीच एटीएस अधिकाऱ्यांच्या समोर हा फोन ओपन करण्यात येऊन स्क्रीनशॉट घेण्यात आले आहे.त्याबाबतचा अधिक तपास करण्यासाठी एक दिवसाची पोलीस कोठडी मागणी करण्यात आली.

Advertisement

गुगलच्या अहवालातून माहिती उघड

कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही ई-मेल पाठवण्यात आले आहेत. या ई-मेलला प्रतिसाददेखील दिलेला आहे. पाकिस्तानातील आयपी ॲड्रेसवर मेल केल्याची माहिती गुगलने दिलेल्या अहवालातून उघड झाली आहे. कुरुलकर याने देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारे काही छायाचित्रे पाठवल्याचा संशयदेखील तपास यंत्रणेला आहे.

Advertisement

कुरुलकर यांच्या जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, याबाबतचा अहवाल एटीएसला मिळाला. २०२२ मध्ये कुरुलकर यांनी सहा देशांना भेटी दिल्या. शासकीय पारपत्राद्वारे कुरुलकर यांनी परदेशात जाऊन पाकिस्तानी हेरांच्या भेटी घेतल्याचा संशय एटीएसला आहे. परदेशात कोणाची भेट घेतली याअनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे.

परदेश दौऱ्याबाबत चौकशी सुरु

Advertisement

कुरुलकर हे परदेशात गेल्याचे चाैकशीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या लोकांना ते परदेशात भेटले का, याबाबत सखाेल तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा प्रकार 13 डिसेंबर 2022 ते 24 फेब्रुवारी 2023 यादरम्यान घडला. कुरुलकर यांनी शत्रू राष्ट्रांशी अनधिकृतरीत्या संवाद साधला.Source link

Advertisement