एजुकेशन: नांदगाव खंडेश्वरची अमरावती जिल्ह्यात बाजी, तिवसा पिछाडीवर सर्वाधिक टक्केवारी 94.17 तर सर्वात कमी 84.26 टक्के


अमरावती2 तासांपूर्वी

Advertisement
 • कॉपी लिंक

जिल्ह्यातील चौदा तालुक्यांपैकी नांदगाव खंडेश्वर तालुक्याने बारावीच्या निकालात बाजी मारली आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.७८ टक्के आहे. त्यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक ९४.१७ टक्के असून तिवसा तालुक्याची टक्केवारी सर्वात कमी ८४.२६ टक्के एवढी आहे.

Advertisement

अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने आज, गुरुवारी बारावी परीक्षेचा निकाल घोषित केला. या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होण्याचे त्यांचे प्रमाण हे अधिक आहे. जिल्ह्यात यावर्षी ३४ हजार ३९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३४ हजार ४८ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले असून ३० हजार ५९२ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होण्याची कसोटी पूर्ण केली आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण ९३.२० टक्के असून मुलांचे प्रमाण ८६.६४ टक्के आहे. शिक्षण मंडळाने पुरविलेल्या माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध महाविद्यालयांमधून परीक्षेत प्रवीष्ठ होणाऱ्यांची संख्या १ हजार १५० होती. त्यापैकी १ हजार ८३ विद्यार्थ्यांना यश मिळाले.

दरम्यान जिल्हा मुख्यालय असलेल्या अमरावती तालुक्यातून यावर्षी सर्वाधिक ११ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परंतु यशवंत होणाऱ्यांची संख्या ८९.५४ टक्के म्हणजेच १० हजार १६० आहे. सर्वात कमी ७६८ विद्यार्थी भातकुली तालुक्यातून परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६६० (८५.९३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर सर्वात कमी निकाल देणाऱ्या तिवसा तालुक्यातून यावर्षी ९९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा निकालही याच आकड्यांच्या आसपास आहे.

Advertisement
 • असा आहे तालुकानिहाय निकाल
 • तालुका प्रवीष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
 • अमरावती ११,३४६ १०,१६० ८९.५४
 • भातकुली ७६८ ६६० ८५.९३
 • नांदगाव खंडेश्वर १,१५० १,०८३ ९४.१७
 • चांदुर रेल्वे १,१७२ १,०९३ ९३.२५
 • धामणगाव रेल्वे १,२५३ १,१२९ ९०.१०
 • तिवसा ९९८ ८४१ ८४.२६
 • मोर्शी १,७५९ १,५३९ ८७.४९
 • वरुड २,३३१ २,११९ ९०.९०
 • चांदूर बाजार २,३६२ २,१५६ ९१.३६
 • अचलपूर ३,२७८ २,८८९ ८८.१३
 • अंजनगाव सुर्जी १,७२५ १,५५७ ९०.२६
 • दर्यापुर २,१५२ १,९०० ८८.२९
 • चिखलदरा १,७२४ १,५६९ ९१.००
 • धारणी २,०३० १,८९५ ९३.३४
 • एकूण ३४,०४८ ३०,५९२ ९०.७८Source link

Advertisement