एचआर मीट 2023: रोजगार निर्मितीसाठी सागर माला उपक्रम महत्वाचा – केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक


पुणे12 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकारने आपल्या 7,517 किमी लाबीच्या किनारपट्टीच्या विशाल क्षमतेचा उपयोग करण्यासाठी सागर माला उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि किनारपट्टीवर बंदरे, आणि इतर पायाभूत सुविधा विकसित करून अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आहे, असे मत एमआयटी महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग द्वारा आयोजित एचआर मीट 2023 मध्ये केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाज व जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

Advertisement

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईकम्हणाले्, सागर माला उपक्रमातून देशातील युवकांना रोजगार मिळाले आहे. किनारपट्टीच्या विशाल क्षमतेचा उपयोग देशाच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केला जात आहे.

सागर माला हा उपक्रम भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक गेम चेंजर आहे. आमच्या किनारपट्टीवर रोजगार निर्माण करण्याची आणि आर्थिक विकासाला चालना देण्याची अफाट क्षमता आहे. या उपक्रमामुळे केवळ नवीन रोजगार निर्माण होणार नाहीत तर शिपिंग आणि सागरी उद्योगांनाचालना मिळेल.

Advertisement

डायरेक्टर जनरल शिपिंग अमिताभ कुमार, म्हणाले, शिपिंग क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्य्यांनी केवळ रोजगारांसाठी शिंपिंग क्षेत्राकडे न पाहता उद्योगासाठी आणि करिअरच्या निवडीच्या दृष्टी लक्ष द्यावे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आम्ही शिपिंग संबंधी अभ्यासक्रम तयार केला आहे. अभ्यासक्रमात नव तंत्रज्ञानाचा समावेश केल्याने विद्यार्थी भविष्यासाठी तयारी करतायेईल. मर्चंट नेव्हीच्या गौरवशाली कारकीर्दीची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. नुकतेच एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मॅनेट पुणे तर्फे इंडस्ट्री अकॉडमी मेळावा “मिलीयू-23” आयोजित केला होता. भारतीय सागरी व्यावसायिकांच्या इतिहासात प्रथमच मंत्री, उद्योग प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्था एका व्यासपीठावर एकत्र आल्या होत्या.

Advertisement

जहाज वाहतूक राज्यमंत्री श्रीपाद नाईक, शिपिंग महासंचालक अमिताभ कुमार, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन अमोल आठल्ये, उपप्राचार्य श्रीकांत गुंजाळ,मॅनेटचे प्रशिक्षण प्रमुख एस.काशीकर आणि भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सागरी कंपन्यांशी संबंधित सुमारे 175 उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement