मुंबई23 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
एकेकाळी महाराष्ट्रात बैठका होत होत्या, आज दिल्ली किंवा गुजरातमध्ये बैठका होत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुजरातमध्ये बैठकीसाठी जाणार असल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. या बाबत खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली.
नीरव मोदी, मेहूल चौक्सीप्रमाणे राज्याच्या तिरोजीचीही लूट सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. निधीच्या माध्यमातून राज्यात हजारो कोटी रुपयांची लूट सुरू असल्याचे ते म्हणाले. निधी वाटपावरुन खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निधी वाटपाची चौकशी करण्याची मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केली. ज्यांनी पक्ष फोडला, त्यांना बेईमानी करुन निधी दिल्याचा आरोप केला.
I. N. D. I. A. आघाडीचा लोगो प्रेरणादाई
मुंबईत होणाऱ्या I. N. D. I. A. आघाडीचा बैठकीत लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. हा लोगो देशातील युवा, बेरोजगारांसह सर्वांनाच प्रेरणादाई असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. हा भारत देश आहे. आणि या देशात आमच्यावर घाव करणे किंवा हल्ला करणे महागात पडेल, अशी प्रेरणा हा लोगो देणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. इंडिया जितेगा याचाही त्यांनी पुर्नउच्चार केला. या लोगोचे अनावर 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
राज्यातील राजकारणासंबंधीत आणखी बातम्या वाचा….
आमदार बच्चू कडूंची वकिलामार्फत भारतरत्न सचिन तेंडुलकरला नोटीस:पैशांसाठी ऑनलाईन गेमिंगला बळी पाडले जात असल्याचा आरोप
भारतरत्न असणाऱ्या माणसाने कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडले जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू, भारतरत्न सचिन तेंडुलकरला आम्ही नोटीस पाठवणार असल्याचे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे. याबाबत वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…