एका भारतीय खेळाडूचा सर्वाधिक निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम अजूनही शाबूत; कोण आहे तो खेळाडू वाचा…

एका भारतीय खेळाडूचा सर्वाधिक निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम अजूनही शाबूत; कोण आहे तो खेळाडू वाचा...
एका भारतीय खेळाडूचा सर्वाधिक निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम अजूनही शाबूत; कोण आहे तो खेळाडू वाचा...

१५ व्या सीझनमध्ये यंदा १० संघ मैदानात उतरले आहेत. प्रत्येक संघ सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आयपीएलच्या चषकाजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान अनेक विक्रमही होतात. अशाच प्रकारचा सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा भारतीय खेळाडूचा विक्रम आजही कायम आहे. इतर कोणत्याही खेळाडूला अद्याप हा विक्रम मोडता आलेला नाही. याच खेळाडूने क्रिकेटबाबत सोशल मीडियावर पोस्ट केलीय. ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. हा भारतीय गोलंदाज कुणी दुसरा नाही, तर प्रवीण कुमार आहे.

https://www.kooapp.com/koo/praveenkumarofficial/383de2f9-3c7c-4084-9c42-262f4219798e

Advertisement

आयपीएलमध्ये एकूण ५ संघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलंदाज प्रवीण कुमारने आपला शेवटचा आयपीएल सामना गुजरात लॉयन्सच्या संघाकडून खेळला होता. त्याच्या गोलंदाजीची जादू काही अशी आहे, की आयपीएलच्या इतिहासात त्याने सर्वाधिक मेडन ओव्हर टाकलेत. खास गोष्ट ही, की प्रवीण कुमारच्या या रेकॉर्डला आजवर कुठलाच गोलंदाज तोडू शकलेला नाही. प्रवीण कुमार गेली ५ वर्ष आयपीएलपासून दूर आहे.

प्रवीण कुमारने क्रिकेट खेळाबाबत कू वर पोस्ट करून म्हटलं, “क्रिकेट पूर्णत: अनिश्चिततांचा खेळ आहे. यात चित्र बदलण्याची शक्यता हरेक क्षणी असते.” या खेळाबाबत असे म्हटले जाते, की हा फलंदाजांसाठी तुलनेने सोपा आणि फायद्याचा आहे, पण गोलंदाजांसाठी खूप अवघड आहे. पण प्रवीण कुमार हा असा खेळाडू आहे, ज्याने फलंदाजांना धावा काढण्यासाठी अक्षरश: तरसवलं.

Advertisement

प्रवीण कुमार आयपीएलमध्ये पाच संघांकडून खेळला आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सीझन्समध्ये प्रवीण कुमार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाचा भाग होता. यादरम्यान वर्ष २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी हॅट्रिकही केली होती. असे करणारा तो आयपीएलचा सातवा गोलंदाज ठरला. वर्ष २०११ ते २०१३3 च्या दरम्यान प्रवीण किंग्स इलेवन पंजाबसाठी खेळला.

अशा प्रकारे प्रवीण कुमारने २००८ ते २०१७ दरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाब, सनराइझर्स हैदराबाद, गुजरात लॉयन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू अशा चार संघांकडून खेळत आईपीएलमध्ये १४ ओव्हर मेडन फेकल्यात. प्रवीण कुमारच्या या ओव्हर्समध्ये आजवर कुठलाच फलंदाज त्याच्या चेंडूवर धावा काढू शकलेला नाही. प्रवीण कुमारच्या आयपीएल करियरबद्दल बोलायचे तर आयपीएलच्या ११९ मॅचेसमध्ये प्रवीण कुमारने ९० विकेट आपल्या नावावर केल्या आहेत.

Advertisement