एका दशकानंतरही अपूर्ण: जम्मू-काश्मीरमध्ये तीन सीएम, 1 राज्यपाल होऊनही नव्या विधानसभेचा प्रकल्प रखडला


  • Marathi News
  • National
  • Jammu And Kashmir, The Project For A New Assembly Stalled Despite Having Three CMs And One Governor

Advertisement

जम्मू / मोहित कंधारी7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • 2011 मध्ये 113 कोटींचा खर्च, आता 68 टक्के वाढून 190 कोटींवर

जम्मू-काश्मीरमध्ये नवीन विधानसभेच्या बांधकामासाठी निधीचा तुटवडा असल्याने दशकभरापासून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. वास्तविक ऑगस्ट २०११ पासून या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. तेव्हा त्यासाठी ११३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता तो ६८ टक्क्यांनी वाढून १९० कोटींच्या घरात पोहोचला आहे. या काळात तीन मुख्यमंत्री, एक राज्यपाल व दोन उपराज्यपाल बदलले. जम्मू-काश्मीर बांधकाम महामंडळास आता दुरुस्ती केलेल्या प्रस्तावास मंजुरीची प्रतीक्षा आहे.

Advertisement

प्रकल्पाच्या प्रभारी अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार २०१५ पर्यंत कामात वेग होता. परंतु भाजप-पीडीपी आघाडी सरकारच्या काळात कामात अडसर आला. कोरोनाकाळातही बांधकाम रखडले. जेकेपीसीचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता प्रदीपकुमार शर्मा म्हणाले, अलीकडेच प्रधान सचिव अरुणकुमार मेहता यांनी बांधकामाच्या ठिकाणाची पाहणी केली व दुरुस्तीचा नवा प्रस्ताव मागवला आहे.

नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस सरकार काळात सुरुवात
नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प सुरू झाला होता. तेव्हा उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होते. त्यानंतर पीडीपी-भाजप आघाडी सरकारच्या दोन मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद व मेहबूबा मुफ्ती यांच्याव्यतिरिक्त राज्यपाल एन.एन. व्होरा, सत्यपाल मलिक व उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांचाही कार्यकाळ संपला.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here