पुणे2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे शहरातील उंड्री परिसरात चार महिन्यांच्या पाळीव श्वानाच्या पिलास चपलेने मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्राणिमित्र संस्थेच्या कार्यकर्त्या महिलेने श्वान मारहाणीची ध्वनिचित्रफीत पाहिल्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली.
जुनैद शेख (रा. उंड्री) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मिशन पाॅसिबल या संस्थेच्या पद्मिनी पीटर स्टंप (वय -६५, रा. गुरुनानकनगर, शंकरशेठ रस्ता,पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शेख यांच्या विरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुनेद शेख यांनी त्याच्या घरातील गॅलरीत चार महिन्यांच्या सायबेरियन हस्की जातीच्या श्वानाला चप्पल, तसेच लाथेने मारहाण केल्याची ध्वनिचित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. त्यानंतर मिशन पाॅसिबल या प्राणिमित्र संस्थेच्या पद्मिनी स्टंप यांनी तो व्हिडिओ पाहिला. त्यात शेख त्यांच्या पाळीव श्वानाला मारहाण करत असल्याचे दिसून आल्यानंतर स्टंप यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक विजय वगरे यासंदर्भात पुढील तपास करत आहेत.
विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल
लग्न करण्यास नकार दिला असताना तरूणीचा विनयभंग करणार्या व लग्नासाठी दबाव टाकून घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या एकावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश रामराव चव्हाण (रा. रामचंद्रनगर, उल्हासनगर, मानपाडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हडपसर येथे राहणार्या एका तरूणाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार मार्च 2023 ते मे 2023 दरम्यान घडला आहे.