एकाचवेळी 30 जणांचा नेत्रदानाचा संकल्प: जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागाचा पुढाकार; डोळ्यांचे ऑपरेशन झालेल्यांच्या नातेवाईकांना निर्णय

एकाचवेळी 30 जणांचा नेत्रदानाचा संकल्प: जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागाचा पुढाकार; डोळ्यांचे ऑपरेशन झालेल्यांच्या नातेवाईकांना निर्णय


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Eye Donation Initiative Of District General Hospital Eye Department Of Eye Donation Of 30 People At A Time Along With Relatives Of Eye Surgery Patients

अमरावतीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मोतीबिंदू, काचबिंदू तसेच इतर दृष्टीदोषामुळे दृष्टीबाधित झालेल्या रुग्णांच्या ऑपरेशननंतर त्यांच्या नातेवाईकांसह एकाचवेळी ३० जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. हा संकल्प येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. नम्रता सोनोने यांच्या पुढाकारामुळे नोंदवला गेला.

Advertisement

सध्या सर्वत्र जागतिक नेत्रदान पंधरवडा राबविला जात आहे. या पंधरवड्याअंतर्गत ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. नम्रता सोनोने यांच्याकडे चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचाही अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्याअंतर्गत डॉ. सोनोने यांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील मोतीबिंदूग्रस्त २१ रुग्णांवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया आटोपल्यानंतर सुटी घेण्यापूर्वी या रुग्णांना पुढील उपचाराची माहिती देण्यात आली. यावेळी रितसर समुपदेशनही करण्यात आले. त्याचवेळी रुग्णांसह त्यांचे नातेवाईक, डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी सामुहिक प्रार्थनेचे पठण केले. यावेळी तब्बल 30 जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला.

या मोहिमेत डॉ. नम्रता सोनोने यांच्यासह चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. श्रीराम फाफट, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. तारे, डॉ. खरात, कर्मचारी हेमंत टोपले, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमाच्या समुपदेशक पुर्ती लाखोडे, परिचारिका चिटुकने यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.

Advertisement

विविध शाळांमध्ये जनजागरण

वैद्यकीय अधीक्षक डॉ. नम्रता सोनोने यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्येही नेत्रदान पंधरवड्याचे कार्यक्रम पार पडले. ठिकठिकाणच्या अशा आयोजनांद्वारे विद्यार्थ्यांकडून नेत्रदानाचा संकल्प करवून घेण्यात आला. एकंदरीत नेत्रदानाविषयी सखोल माहिती पुरविण्यासोबतच विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये जनजागरणही करण्यात आले.

AdvertisementSource link

Advertisement