एकच मिशन जुूनी पेन्शन: शासकीय निम – शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्यापुरात महामोर्चा; शेकडो कर्मचारी झाले सहभागी


अमरावतीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

दर्यापुरातील एकच मिशन जुनी पेंशन या महामोर्चात सहभागी विविध विभागाच्या संघटनांचे कर्मचारी

२००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन नाकारून केंद्राची पेंशन योजना लागू केली. या विरोधात पुन्हा जुनी पेंशन लागू करा या एकमेव मागणीसाठी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दर्यापूर तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर विविध कर्मचारी संघटना सुद्धा १४ मार्चपासून संपात सक्रिय सहभागी आहेत.

Advertisement

संपाच्या तिसऱ्या दिवशी गुरूवारी (दि. १६) दर्यापूर शहरातील गांधी चौक येथून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयापर्यंत सर्व कर्मचारी संघटनांच्या नेत्यांद्वारे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

शेकडो कर्मचारी एसडीओ कार्यालयासमोर आले असता, मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. सभेमध्ये विविध नेत्यांची भाषणे झाली. त्यामध्ये प्रत्येक नेत्याने जुनी पेंशन कशी महत्त्वाची हे समजून सांगीतले. त्यानंतर दुपारी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांना तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार, जलसंधारण अधिकारी प्रशांत वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध संघटनाचे प्रतिनिधी पदाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी असलेले निवेदन दिले.

या वेळी राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल भारसाकळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुकाध्यक्ष तुळशीदास धांडे, शिक्षक बँकेचे संचालक संजय नागे, जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष किशोर बुरघाटे, आल्हाद तराळ, चेतन आढाऊ, परिमल नळकांडे, शिक्षक संघ सरचिटणीस डी. आर. जामनिक, महसूल कर्मचारी संघटनेचे विनोद जाधव, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण, नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ विल्हेकर, राहुल देशमुख, जि. प. लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल घुगे, जि. प. कर्मचारी युनियनचे अध्यक्ष गजानन गोहत्रे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे कमलाकर भोंगळे, विदर्भ उपयोगी पटवारी संघटनेचे सौरभ वानखडे, न. प. विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे कलीम खान, शिक्षक समिती महिला आघाडीचे अध्यक्ष सविता ढाकरे, संगीता कोकाटे, कास्टस्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पद्माकर खाडे, स्वयंरुप नवरे, अनिल मोहोळ, पदवीधर संघटनेचे अध्यक्ष अशोक बावणेर, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे शराफतुल्ला, शिक्षक भारतीचे अरविंद चराटे, अखिल महाराष्ट्र उर्दू संघटनेचे मोहम्मद निसार, महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे मोहम्मद शकील, मोहम्मद इर्शाद, अनेक विभागाच्या संघटनांचे शेकडो महिला व हजारो कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement