एकच मिशन, जुनी पेन्शन: शस्त्रक्रिया रद्द, आेपीडी बंद;‎ कर्मचारी संपाने सिव्हिल ठप्प‎


नाशिक‎13 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन‎ याेजना लागू करण्याच्या मागणीसाठी‎ पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्हा‎ रुग्णालयातील सेवा प्रभावित झाली.‎ पहिल्याच दिवशी ११ शस्त्रक्रिया पुढे‎ ढकलल्या. तर आेपीडीही बंद असल्याने‎ रुग्णांचे हाल झाले.‎ आरोग्य विभागाही संपात सहभागी‎ जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा‎ कोलमडली आहे. सकाळी ९ वाजेपासून‎ बाह्यरुग्ण विभागात रुग्णांसह‎ नातेवाइकांच्या रांगा लागल्या होत्या.‎

Advertisement

परिचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि‎ प्रशासकीय कर्मचारी संपात सहभागी‎ झाल्याने रुग्णसेवेसह प्रशासकीय‎ कामकाजही कोलमडली होते. सकाळी‎ ९ वाजता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर‎ कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.‎ वार्डमध्येही प्रशिक्षित परिचारिका‎ नसल्याने रुग्णांवर उपचार देण्यास विलंब‎ झाला होता. संपामध्ये जिल्हा नर्सेस‎ असोसिएशनशी सहभागी झाली हाेती.‎

यांचा संपात सहभाग‎
जिल्हा परिषद – निमसरकारी,‎ शिक्षक-शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी, स्थानिक‎ स्वराज्य संस्था, कर्मचारी संघटना तसेच‎ शिक्षक, ग्रामसेवक, लिपिक, लेखा,‎ प्रशासन अधिकारी, पशुचिकित्सा, नर्सेस,‎ अंगणवाडी सुपरवायझर, आरोग्यसेवक,‎ स्थापत्य अभियंता, शाखा अभियंता,‎ विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत, कृषी,‎ सांख्यिकी), औषधनिर्माण अधिकारी,‎ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कृषी‎ तांत्रिक, परिचर, वाहनचालक, मैल‎ कामगार, हातपंप देखभाल दुरुस्ती या‎ संवर्गातील कर्मचारी.‎

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement