एकच चर्चा: गौतमी पाटीलने उदयनराजेंना दिले खास गिफ्ट, राजेंना कलाकारांची जाण- भेटीनंतर गौतमीकडून कौतुक


साताराएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

डॅशिंग उदयनराजे भोसले आणि सबसे कातिल गौतमी पाटील यांची नुकतीच भेट झाली. साताऱ्यातील उदयनराजेंचे निवासस्थान जलमंदिर येथे जात गौतमी पाटीलने उदयनराजेंची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी राजेंसाठी एक खास भेटही गौतमीने नेले होते.

Advertisement

काय भेट दिली?

याबाबत स्वत: गौतमी पाटीलनेच माहिती दिली आहे. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना गौतमी पाटीलने सांगितले की, उदयनराजे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. सुरूवातीला मी त्यांच्यासाठी फक्त पुष्पगुच्छ घेतला होता. मात्र, मला माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले की, उदयनराजेंना परफ्यूम फार आवडतो. त्यामुळे मी त्यांच्यासाठी एक परफ्यूम घेऊन आले व त्यांनी ते भेट म्हणून दिले.

Advertisement

विविध विषयांवर चर्चा

गौतमी पाटील काल एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आली होती. याचदरम्यान तिने उदयनराजेंच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली, असेही गौतमी पाटीलने सांगितले. माध्यमांना प्रतिक्रिया देताना गौतमी पाटील म्हणाली, मी महाराजांना पहिल्यांदा भेटले. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा यासाठी मी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आले. उदयनराजे यांना कलाकारांची जाण आहे.

Advertisement

उदयनराजे मोठे नेते

महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारे दोघे जण एक गौतमी पाटील व दुसरे उदयनराजे भोसले आज एकत्र आले, याकडे कसे पाहता?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता गौतमी पाटील म्हणाली, छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे दैवत आहेत. उदयनराजे खूप मोठे नेते आहेत. मी फार छोटी कलाकार आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे आम्हा दोघांचे नाव सोबत घेऊ नका, अशी विनंतीही गौतमी पाटीलने केली.

Advertisement

सोलापूरमध्ये गौतमी पाटीलविरोधात तक्रार

दरम्यान, सोलापूरमधील बार्शी या ठिकाणी गौतमी पाटीलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. 12 मे रोजी बार्शी येथे येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, गौतमी पाटीलला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आपले नृत्य सादर करायचे होते. तिच्या कार्यक्रमासाठी चाहत्यांनी खास तिकीटे काढून हजेरी लावली होती. मात्र, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलने कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. टाळ्या आणि शिट्यांनी तिचे स्वागत करण्यात आले. मात्र, गौतमी पाटील ही परफॉर्मन्स करण्यासाठी रात्री 9.56 वाजता स्टेजवर आली. एकच गाणे झाल्यानंतर पोलिसांनी वेळ संपली म्हणून कार्यक्रम बंद पाडला. गौतमी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याचा आयोजक गायकवाड यांनी आरोप केला.

Advertisement

हेही वाचा,

कलेतून फेमस व्हा:गौतमीताई महाराष्ट्राचा बिहार करू नका, छोटा पुढारी घनश्याम दराडेचे गौतमी पाटीलला हात जोडत थेट आवाहन

Advertisement

लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. फेमस होण्यासाठी तिला चुकीच्या वळणावर नेऊ नका. गौतमीताई महाराष्ट्राचा बिहार करु नका, असे आवाहन छोटा पुढारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडे याने गौतमी पाटीलला केले आहे. गौतमी आणि वाद हे समीकरणच झाले आहे. अनेक कलावंत, नेते यांच्याकडून आत्तापर्यंत गौतमीवर टीका करण्यात आली आहे. आता छोट्या पुढारीनेही गौतमी पाटीलला एक आवाहन केले आहे. घनश्याम दराडे याने गौतमीला महाराष्ट्राचा बिहार करु नका, असे म्हणत टोला लगावला आहे. वाचा सविस्तरSource link

Advertisement