मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
उर्फी जावेदलाच भाजपा का टार्गेट करत आहे? उर्फी जावेद मुस्लीम आहे म्हणून तिला टार्गेट केले जात आहे का? असे सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी उपस्थित केले आहेत. तसेच फक्त उर्फीच कशाला कंगणा रनौत, दीपीका पादुकोन, कतरिना कैफ या अभिनेत्री देखील बोल्ड कपडे घालतात, त्यांच्यावरही टीका करा. असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेले वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर काल उर्फी जावेदला सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली होती. त्यानुसार उर्फी जावेदने आंबोली पोलिस ठाण्यात हजेरी लावली. पोलिसांनी उर्फी जावेदची काल 2 तास चौकशी केली. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत आहे.
देश संविधानानुसार चालतो
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई म्हणाल्या, आपला देश संविधानानुसार चालतो. उर्फीने काय कपडे घालावे आणि काय घालू नये हा तिचा प्रश्न आहे. या आधी अनेक अभिनेत्रींनी बोल्ड कपडे घातले आहेत. मविआच्या काळात केतकी चितळलेा त्रास दिला. तसे उर्फी जावेदला वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये फिरवले जाईल.
न्याय मिळालाच पाहिजे
तृप्ती देसाई म्हणाल्या, सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. पोलिसांना विनंती आहे की, संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा अधिकार दिला आहे तर योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे. विनाकारण उर्फी जावेदला कुणी टार्गेट करत असेल तर आम्ही तिच्यासोबत आहोत. असेही तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले.
आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार
उर्फी जावेद हिने मुंबई पोलिसांत शनिवारी जबाब नोंदवला आहे. उर्फी जावेद म्हणाली, माझ्या आवडीचे कपडे घालण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. मी भारतीय नागरिक आहे. हा अधिकार मला संविधानाने दिला आहे. मी माझ्या आवडीचे आणि व्यावसायिक गरजेनुसार कपडे घालते. छायाचित्रकार माझे फोटो काढतात. त्यातील काही फोटो व्हायरल होतात. व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवू शकते? असा सवालही तिने विचारला.