उर्दू व अरेबिक डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात: आतापर्यंत 1500 वर लोकांनी घेतले ‘मराठी’ भाषेतून ‘उर्दू’ भाषेचे धडे


नाशिकएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे डिप्लोमा इन उर्दू लैंग्वेज तसेच डिप्लोमा इन फंक्शनल अरेबिक हे कोर्स नाशकातील नॅशनल सिनीयर कॉलेजमध्ये सुरू करण्यात आले आहे. दोन्ही कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू असून 31 जानेवारी ही अंतिम मुदत आहे. अशी माहिती कॉलेज व्यवस्थापन मंडळाचे सचिव प्रा. जाहीद शेख यांनी दिली आहे.

Advertisement

18 वर्षांपासून शहरात मराठी भाषेतून उर्दू भाषेचा पदविका अभ्यासक्रम सुरू असून, यामध्ये बिगर उर्दू भाषिकांची संख्या मोठी आहे.आतापर्यंत 1500 वर लोकांनी ‘मराठी’ भाषेतून ‘उर्दू’ भाषेचे धडे घेतले आहे.

ज्यांना उर्दू भाषा येत नाही व उर्दू भाषा शिकण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे. हे दोन्ही कोर्सेस गेली 18 वर्षांपासून नाशकात सुरू आहेत. आतापर्यंत शेकडो गैर उर्दू भाषिकांनी हा कोर्स पूर्ण करून उर्दू भाषा अवगत केली आहे. उर्दू डिप्लोमा हा एक वर्षाचा असून अरेबिक डिप्लोमा दोन वर्षांचा आहे. दोन्ही कोर्सेसची प्रवेश तथा संपूर्ण कोर्सची फी मात्र दोनशे रुपये आहे. ज्यांना उर्दू भाषा अजिबात येत नाहीत व त्यांना उर्दूचा गोडवा अनुभवाचा आहे. त्यांच्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट नसून केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषा अवगत असावी, अशी एकमेव अट आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अख्त्यारीखालील नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लैंग्वेज, नवी दिल्ली मार्फत हे दोन्ही कोर्सेस चालविले जात आहेत. अधिक माहितीसाठी सारडा सर्कल येथील नॅशनल कॅम्पसमध्ये केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 9225798648 येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

1500 वर जणांनी घेतले मराठीतून उर्दूचे धडे

18 वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत उर्दू पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. एक तपापासून अभ्यासक्रम अखंडितपणे चालविला जात आहे. सुरुवातीला काही बॅचमध्ये प्रवेशसंख्या कमी होती; मात्र या अभ्यासक्रमाचा प्रचार-प्रसार होताच प्रवेशसंख्या वाढली आहे.आतापर्यंत 1500 वर जणांनी मराठीतून उर्दूचे धडे घेतले असून यात 700 बिगर उर्दू भाषिकांचा समावेश आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement