नाशिकएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
ग्रामीण पोलिस दलात पोलिस शिपाई चालक पदासाठी ६० उमेदवारांची चाचणी मंगळवारी (दि. २४) घेण्यात आली. उर्वरित उमेदवारांची चाचणी आज घेण्यात येणार आहे. चालक पदासाठी २११४ उमेदवार पात्र ठरले आहे. या पात्र उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी परिक्षा ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरु आहे. सायंकाळ पर्यंत ही चाचणी सुरू होती. यातील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात येणार आहे. शिपाई पदासाठी १८९३५ उमेदवार पात्र ठरले आहे. चालक शिपाई पदासाठी २११४ उमेदवार पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू आहे. चालक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदाणी चाचणी पूर्ण झाली असून वाहन चालवण्याची चाचणी सुरू आहे. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड हाेईल.