उपमुख्यमंत्री 5 दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना: नरेंद्र मोदींनंतर फडणवीसांना मिळाला स्टेट गेस्ट म्हणून शासकीय अतिथीचा दर्जा

उपमुख्यमंत्री 5 दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना: नरेंद्र मोदींनंतर फडणवीसांना मिळाला स्टेट गेस्ट म्हणून शासकीय अतिथीचा दर्जा


मुंबईएका मिनिटापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जपान सरकारच्या निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपानला दौऱ्यावर रवाना झाले आहेत. महाराष्ट्र आणि जपानच्या मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर या दरम्यान स्वाक्षऱ्या होतील. दोन्ही देशांच्या सहकार्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Advertisement

या संदर्भात जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) कडून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य मिळवून विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांना राज्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. जपान दौऱ्यात ते विविध मान्यवरांची भेट घेणार आहेत. त्यात जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासह इतर महत्वाच्या मंडळींचा समावेश आहे. फडणवीसांच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्टेट गेस्ट म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तसेच फडणवीसांचा जपानमध्ये ‘स्टेट गेस्ट’म्हणून देखील गौरव करण्यात येणार आहे.

या दौऱ्यात फडणवीसांसाठी जपानच्या शाही महालमध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केले असून विविध कंपन्यांसह गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा देखील होणार आहे. जपान-इंडिया असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या दौऱ्यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला देणार चालना देण्यावर भर असणार आहे. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदार तसेच जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांचीही ते या दौऱ्यावेळी भेट घेणार आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये दौरा केला होता. जायकाने विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना वित्तपुरवठा केला होता. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-3, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

Advertisement



Source link

Advertisement