उपआयुक्त म्हणतात शाखा अभियंता बदलीचा प्रस्ताव जुनाच: सोयीच्या बदल्यांसाठी पालिकेत प्रशासन गतिमान; अभियंता बदली वादात


नाशिकएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

वर्षानुवर्षे एकाच टेबलवर बसलेला हटवण्याऐवजी महापालिकेत कधीही व कोणाच्याही सोयीने बदल्यांचे प्रकार सुरू झाले असून त्यास आयुक्त कार्यालय देखील अपवाद नसल्यामुळे प्रशासकीय राजवटीमध्ये नेमके कोणाचे चांगभले असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात गुणवत्ता नियंत्रण विभागात पंचवटी येथील एका अभियंत्याची वर्णी लावण्यासाठी सर्वप्रथम येथील अधिकाऱ्याची ड्रेनेज विभागात बदली करण्यात आली व त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिष्ठापना केल्यामुळे प्रशासनाची गतिमानता वादात सापडली आहे.

Advertisement

महापालिकेमध्ये गेल्या 24 वर्षांपासून नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असून पालिका ‘क’ वर्ग आकृतीबंधानुसार, 7082 पदे मंजूर असताना सद्यस्थितीमध्ये साडेचार हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी कमी असल्याचे कारण देत एकाच टेबल वर्षानुवर्षापासून मक्तेदारी निर्माण झाली आहे. वास्तविक, दरवर्षी विंनती किंवा प्रशासकीय बदल्या साधारणपणे एप्रिल मे महिन्यात केल्या जातात. ज्यांना एकाच टेबलवर तीन किंवा पाच वर्षे झाले आहे अशांच्या प्रशासकीय बदल्या तसेच ज्यांना वैद्यकीय व अन्य शासन नियमानुसार अन्य महत्त्वाची कारणे आहे त्यांच्या विनंती बदल्या केल्या जातात.

मात्र गेल्या काही वर्षात प्रशासकीय बदल्या कमी व विनंती केली की चटकन ती शिरसावंद्य मानून त्यानुसार बदली करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यामध्ये प्रशासन विभागाने एका सहाय्यक कनिष्ठ अभियंत्यासह दोन शिपायांच्या प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सोयीचे या नावाखाली बदल्या केल्या. परंतु, संबंधितांविषयी कोणत्याही प्रकारचा आक्षेप नसताना केवळ पंचवटी विभागातील एका शाखा अभियंत्यांच्या सोयीसाठी बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

गुणनियंत्रण विभागात पंचवटी विभागातील शाखा अभियत्याच्या वर्णी लावण्यासाठी सर्वप्रथम येथील जागा रिक्त करण्यात आली. वास्तविक संबंधित शाखा अभियंत्याची बदली ड्रेनेज विभागात करता आली असती. सेवानिवृत्तीस काहीच महिने शिल्लक असताना नगररचना विभागातून महिवाल नामक अभियंत्याची नाशिकरोड विभागीय कार्यालयात बदली करण्यात येऊन त्या जागेवर नाशिकरोड येथील अभियंत्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया वादात सापडली आहे.

प्रस्ताव जुनेच; अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन

Advertisement

​​प्रशासन विभाग​​​​​​​ उपआयुक्त मनोज घोडे पाटील​​​​​​​ म्हणाले की, शाखा अभियंता बदलीचा प्रस्ताव जुनाच होता तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागात दोन शिपाई अतिरिक्त असल्यामुळे त्यांचे समायोजन केले. त्यात काही चूक नाही.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement