उद्योगांना फटका: वाहनाच्या धडकेत वीजखांब कोसळल्याने चाकण MIDC तील 30 उद्योगांचा वीजपुरवठा खंडित, नंतर पुन्हा सुरळीत


पुणे26 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अज्ञात वाहनाने ३३ केव्ही डबलसर्कीट वीजवाहिन्यांच्या खांबाला रविवारी (दि.१९) पहाटे एक वाजताच्या सुमारास धडक दिली. यामध्ये वीजखांबासह वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. त्यानंतर महावितरणकडून तातडीने पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना करून आज दुपारी सर्वच ३० उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या चाकण १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून ह्युंदाई-कॉर्निंग ३३ केव्ही डबल सर्किट वीजवाहिनीद्वारे चाकण एमआयडीसी फेज दोनमधील उद्योगांना वीजपुरवठा केला जातो. मात्र या वीजवाहिनीच्या खांबाला आंबेठाण रस्त्यावर अज्ञात वाहनाने आज पहाटे एकच्या सुमारास धडक दिली. नंतर चालक वाहनासह पळून गेला. मात्र या धडकेत वीजखांब व डबल सर्कीटच्या वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्याने चाकणमधील ३० उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे, शाखा अभियंता रामप्रसाद नरवडे, जनमित्र योगेश जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन इतर वीजवाहिन्यांद्वारे पर्यायी वीजपुरवठ्याची तयारी सुरु केली. तांत्रिक उपाययोजना झाल्यानंतर सर्वच ३० उद्योगांचा वीजपुरवठा दुपारी १२.४१ वाजता पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला.

Advertisement

जमीनदोस्त झालेल्या वीजखांबाची उभारणी, वीजवाहिन्यांची जोडणी तसेच डिस्क इन्सूलेटर बदलण्यासह इतर कामे सुरु करण्यात आले असून सायंकाळपर्यंत सर्व कामे पूर्ण होणार आहेत. दरम्यान वीजखांबाला धडक देऊन नुकसान करणाऱ्या अज्ञात वाहनचालकाविरुद्ध महावितरणकडून फौजदारी फिर्याद दाखल करण्यात येत आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement