उद्या जोरदार पावसाची शक्यता: छत्रपती संभाजीनगरात शुक्रवारी नऊ तासांत पडाला 5.5 मिमी पाऊस

उद्या जोरदार पावसाची शक्यता: छत्रपती संभाजीनगरात शुक्रवारी नऊ तासांत पडाला 5.5 मिमी पाऊस


छत्रपती संभाजीनगर4 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता हलक्या पावसाला सुरूवात झाली होती. दुपार व सायंकाळच्या सत्रात अधून मधून पुन्हा पाऊस पडला. सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 5.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेध शाळेने घेतली. तर शनिवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

Advertisement

छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील पहिले पाच दिवस कोरडे गेले. माञ, ६ सप्टेंबर सायंकाळनंतर ते ९ सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला. त्यानंतर उघडीप मिळाली होती. आता पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. गुरूवारी 0.8 मिमी, शुक्रवारी अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसाच्या सरींनी वाहन चालक, कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना, पर्यटकांना, विद्यार्थ्यांना ओलेचिंब केले. तर काही नागरिकांनी पावसापासून बचावासाठी छत्री, रेनकोटचा वापर कल्याचे दिसून आले.

सप्टेंबरमधील पावसाची स्थिती

Advertisement

ऑगस्टमध्ये केवळ 24 टक्केच पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले होते. मात्र, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडतोय. 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात 75.3 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 90.6 मिमी म्हणजे 120.4 टक्के प्रत्यक्ष पाऊस पडला.

तापमानात घसरण

Advertisement

दिवसभ ढगांचे दाट आच्छादनाने सूर्यकिरण आडवल्या गेली. पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला होता. परिणामी सरासरीच्या तुलनेत 5 अंशांनी तापमानात निचांकी घट होवून ते 25.4 अंश आणि किमान 20.2 अंश दोन अंशांनी कमी नोंदवले गेले.

पुढे काय?

Advertisement

शनिवारी धो धो पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच श्री गणेश उत्सवातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे मोठा दिलासा मिळेल. खरीप पिकांसाठी व जलभरणासाठी उपयुक्त ठरणार आहे.



Source link

Advertisement