कोल्हापूर39 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शरद पवार व अजित पवार एकत्रच आहेत. काका-पुतण्या मिळून महाराष्ट्राला येड्यात काढत आहे, अशी टीका प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केली होती. त्यावरून शरद पवारांनी आज आमदार बच्चू कडूंची चांगलीच खिल्ली उडवली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
गल्लीबोळातील लोकांविषयीही विचारल
पत्रकारांनी बच्चू कडूंच्या आरोपांविषयी विचारले असते बच्चू कडू कोण ए बाबा? असा उलट सवालच शरद पवार यांनी केला. पुढे शरद पवार म्हणाले मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळेस एका राज्याचा मुख्यमंत्री राहिलेलो आहे. केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मी सांभाळली आहे. मला कोणाच्याही वक्तव्यांबाबत काय विचारता. उद्या गल्लीबोळातील लोकांविषयी मला प्रतिक्रिया विचाराल.
ते आमदार तर मी मुख्यमंत्री
शरद पवारांचे हे उत्तर समोरील काही पत्रकारांना पटले नाही. पत्रकार म्हणाले, बच्चू कडू कोणाच्याही पाठिंब्याशिवाय चार वेळेस निवडून आलेले आहेत. ते चार वेळेस आमदार राहिलेले आहेत. त्यावर शरद पवार लगेच उत्तरले, बच्चू कडू चार वेळेस आमदार झालेत, तर मी चार वेळेस मुख्यमंत्री राहिलेलो आहे. काही फरक आहे ना? शरद पवारांच्या या वक्तव्यावर समोरील पत्रकारांनाही हसू आवरले नाही.
काय म्हणाले होते बच्चू कडू?
बच्चू कडूही काल कोल्हापुरात होते. तर, काल सकाळीच अजित पवार आमचेच नेते, असे वक्तव्य करून शरद पवारांनी चांगलाच धुराळा उडवून दिला होता. त्यावर खोचक प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे. थेट ऑलिम्पिकसारखाच गेम असू शकेल. पवार काका पुतण्या महाराष्ट्रातील लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिले तर डोके फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडले तसे इथे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. सगळ्यांचा संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करत असतील.
संबंधित वृत्त
मी NDAमध्ये जाणार म्हणणारे मुर्खाच्या नंदनवनात:शरद पवारांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल, नेतृत्वाची पातळी किती घसरली हे दिसते
भाजप्रणीत एनडीएमध्ये सहभागी व्हावे, अशा पद्धतीने शरद पवारांची वाटचाल सुरू आहे, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावर असे वक्तव्य करणारे मुर्खाच्या नंदनवनात राहतात, असे जोरदार प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले आहे. शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, मी भाजपसोबत जाणार, असे खुळचटपणाचे वक्तव्य काही पक्षाचे नेतृत्व अलेल्या नेत्यांकडूनच केले जात आहे. मला त्यांना सांगायचे आहे की, ते मुर्खांच्या नंदनवनात राहतात. त्यांचे वक्तव्य अत्यंत खुळचटपणाचे आहे. मी भाजपसोबत जाणार, असे वक्तव्य करून या पक्षाच्या नेतृत्वाची पातळी किती घसरली, हे लक्षात येते. वाचा सविस्तर