उद्धव ठाकरे म्हणाले-: 2024च्या निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिर उद्घाटनादरम्यान देशात दंगली घडवण्याची शक्यता

उद्धव ठाकरे म्हणाले-: 2024च्या निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिर उद्घाटनादरम्यान देशात दंगली घडवण्याची शक्यता


हिंगोली11 तासांपूर्वी

Advertisement
 • कॉपी लिंक

2024 मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार देशात दंगली घडवू शकते, याकडे लक्ष द्या. राममंदिरांच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातून हिंदू लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. पण हा सोहळा झाल्यानंतर हिंदू घरी परतताना एखाद्या मुस्लिम भागात हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवून आणल्या जाऊ शकतात, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

राज्यात दुष्काळ आहे आणि देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. टरबूजालाही पाणी लागते असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता टरबूज असा उल्लेख केला. फडणवीस यांना मी बोलणे सोडले मागे मी त्यांना कलंक बोललो,त्यांना फडतूस गीडतुस बोललो तर बोबाटा झाला. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून एकनाथ शिंदे गटावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. मी गद्दारावर वेळ घालनार नाही. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर हल्लाबोल केला.

Advertisement

UPDATE

 • ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सभेसाठी येण्यासाठी गाड्या लावाव्या लागत नाही. काही जण हिंगोलीत कावड यात्रा श्रद्धेसाठी नाही तर स्वत:ची मार्केटिंग व्हावी म्हणून काढणारे आमदार आहेत, असे म्हणत संतोष बांगर यांच्यावर अंबादास दानवे यांनी टीकास्त्र डागले आहे.
 • हिंगोली जिल्ह्यातील दोन नंबरचे धंदे करा म्हणत युवकांना तयार करणाऱ्या नेत्याच्या तावडीत हा जिल्हा अडकला आहे असे म्हणत अंबादास दानवे यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.
 • सरकार कसेही असो पण बळीराजा सुजलाम सुफलाम कर – उद्धव ठाकरे
 • माझी सभा ही जनतेसाठी आहे, गद्दारांसाठी नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. शंभू महाराजांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. संतोष बांगरांचा उद्धटपणा चिरडून टाथवा लागेल. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्यास हिंदुत्ववादी म्हणायचे का? असे म्हणत आमदार संतोष बांगर यांच्यावर टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी डागले आहे. काही जणांना अपेक्षा असेल मी गद्दरांवर बोलेन, पण मी गद्दरांवर वेळ घालवणार नाही. मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो असून, त्यावरच बोलणार आहे. मागे नागपंचमी झाली. आपण या गद्दाराला दूध पाजले पण त्याने पलटून चावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा सापांना पायखाली ठेचले पाहिजे.
 • उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार आपल्या दारी थापा मारतंय. कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवत आहे. डबल आणि ट्रिपल दंजित सरकार शेतकऱ्यांसाठी काय करत आहे? सरकार आपल्या दारी आणि घोषणा केवळ कागदावरी अशी परिस्थिती.
 • उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपमध्ये सर्व आयाराम आहेत, त्यांच्याकडे अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासाठी मला वाईट वाटत आहे. संतरज्या घालण्यासाठी भाजपचे जुने कार्यकर्ते काम करताय आणि बाहेरचे येऊन सत्ता उपभोगत आहेत.
 • उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. दिल्लीतील वडीलांमध्ये मत मागायची ताकद नाही का. ही केवळ नामर्दपणा आहे. एनडीए हे घमेंडी आहे.
 • आमचे हिंदुत्व मुखात राम आणि हाताला काम देणार – उद्धव ठाकरे
 • हिंगोलीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांची तुलना सापाशी केली. कांदाप्रश्नी सरकारने मध्यस्थी केली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
 • एनडीएचा अमिबा झालाय, असे म्हणत उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवरुन केलेल्या टीकेला टीकेने उत्तर दिले आहे. आम्ही इंडिया तुम्ही घमेंडिया झाला आहात, असे शब्दात ठाकरे यांनी हल्लाबोल केला. तसेच इंडिया म्हणून आम्ही एकत्र आल्यानंतर पंतप्रधान घसरले, असेही ठाकरे म्हणाले.
 • मटक्याचे अड्डे चालवणाऱ्यास हिंदुत्ववादी म्हणायचे का? आमदार संतोष बांगर यांच्यावर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
 • नरेंद्र मोदींना थापाड्या म्हणायचे होते पण नाही म्हणणार; टरबुजाच्या झाडालासुद्धा पाणी लागते – उद्धव ठाकरे
 • उद्धव ठाकरे म्हणाले की, आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन हे अहमदाबादमधीन नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी अहमदाबादमध्ये सामन्याचे आयोजन केल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंगोलीतील जाहीर सभेतून प्रश्न विचारला आहे. तुमच्या स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना चालतो, हे कुठले देशप्रेम आहे, असा प्रश्न उपस्थित करुन ठाकरे यांनी मोदींना देशप्रेमाची आठवण करुन देण्याचा प्रयत्न करुन केला आहे.
 • राज्यात दुष्काळ आहे आणि देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. टरबूजालाही पाणी लागते असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता टरबूज असा उल्लेख केला. “फडणवीस यांना मी बोलणे सोडले मागे मी त्यांना कलंक बोललो,त्यांना फडतूस गीडतुस बोललो तर बोबाटा झाला. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.Source link

Advertisement