उद्धव ठाकरेंचे गुण अन् विचार पाहता डीएनए तपासणीची गरज: उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा होऊच शकत नाही – नीतेश राणे

उद्धव ठाकरेंचे गुण अन् विचार पाहता डीएनए तपासणीची गरज: उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा होऊच शकत नाही – नीतेश राणे


मुंबई11 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

वर्षानुवर्षे आमच्या मनात जो संशय होता तो हळू हळू वाढत चालला आहे किंबहुना त्यावर शिक्कामोर्तब होत आहे की, खरेच उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे का? की त्याला मुंबईतील कचऱ्यातून उचलून ठाकरे आडनाव दिले आहे? त्याचे गुण आणि विचार पाहता डीएनए तपासणीची गरज वाटत आहे. कुठल्याच बाजूने हा बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र वाटत नाही, अशी एकेरी भाषेत टीका भाजप आमदार नीतेश राणे यांनी केली आहे.

Advertisement

दरम्यान नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे रक्त त्याच्यात असेल, तो खरेच त्यांचा पुत्र असता तर हिंदू धर्माबद्दल होणारी भाषणे, राम मंदिराच्या निर्माणासंदर्भात होणारी वक्तव्ये आणि काँग्रेसच्या ज्या प्रकारे तो प्रेमात पडला आहे ते बघितल्यानंतर हा बाळासाहेबांचा मुलगा होऊच शकत नाही, ठाकरेंच्या घरात जन्माला येऊच शकत नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

उद्धव ठाकरे म्हणायचे की उद्धव गांधी?

Advertisement

आमदार नीतेश राणे म्हणाले की, राम मंदिराविषयी केलेल्या वक्तव्याबाबत NIA ने उद्धव ठाकरे यांना अटक करावी. उद्धव ठाकरे याचा इतिहास दंगली घडवण्याचा आहे. दंगली भडकवल्याशिवाय तो सत्तेत येऊ शकत नाही हे त्यांना माहित आहे. आज राहुल गांधी युरोपमध्ये जाऊन चीनचे जे गोडवे गात आहे. हिंदूविरोधी जी भूमिका घेत आहे. ती आता उद्धव ठाकरे घ्यायला लागला आहे. याला उद्धव ठाकरे म्हणायचे की उद्धव गांधी म्हणायचे हा आता आमच्यासमोर प्रश्न आहे, असा हल्लाबोल नीतेश राणे यांनी केला आहे.

ही धमकी समजा किंवा आवाहन

Advertisement

नीतेश राणे म्हणाले की, 2014 ते 2019 मध्ये जेवढे रक्ताच्या भावाने सांभाळल नाही तेवढे प्रेम आणि विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. याच्यासारखा नमकहराम ज्या मातोश्री 2 मध्ये राहतोय ते मातोश्री 2 हा देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. त्या देवेंद्र फडणवीसांवर असे बोलत असताल तर तुझे थोबाड बंद करण्याची हिंमत आमच्याकडे आहे. पोलिसांना मी सांगेन की महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवायची असेल तर यांचे थोबाड बंद ठेवा. नाहीतर आमचे कार्यकर्ते कोणत्या तरी सभेमध्ये स्टेजवर जातील आणि लाथांनी आणि चपलेने तुडवून तोंडावर काळी शाई फासतील, मग त्यांच्यावर केसेस करायच्या नाहीत. ही धमकी समजा किंवा आवाहन.

सडलेली वांगी की वाकलेली काकडी?

Advertisement

नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, दुसऱ्यांच्या शरीराबद्दल हा व्यक्ती बोलतो. हातवारे करुन दुसऱ्यांच्या शरीराचे विश्लेषण करतो पण त्याला स्वतःच्या शरीराचा थांगपत्ता नाही. पुरुष आहे की स्त्री हे तपासण्याची आता वेळ आली आहे. उभे राहायला यांना दोन माणसे लागतात आणि अशा व्यक्तीने दुसऱ्यांच्या शरीरावर बोलणे याला सडलेली वांगी बोलायचे की वाकलेली काकडी बोलायचे? असा जहरी सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.Source link

Advertisement