उद्धव ठाकरेंकडून आज वर्धा, यवतमाळ-वाशिम, रामटेक लोकसभा मतदार संघाचा आढावा: प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधतील संवाद

उद्धव ठाकरेंकडून आज वर्धा, यवतमाळ-वाशिम, रामटेक लोकसभा मतदार संघाचा आढावा: प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधतील संवाद


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज विदर्भातील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. आज ते वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि रामटेक या मतदार संघाबाबत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

Advertisement

आगामी निवडणुकीत या मतदार संघात पक्षाची रणनीती कशी असायला हवी, आघाडी झाल्यास किंवा झाली नाही तर, या मतदार संघात कोणता उमेदवार विजय मिळवू शकतो, अशा सर्व मुद्यांवर ते चर्चा करतील. आगामी काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही आदेशही देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने पक्षाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे.

बंडखोर खासदारांना धडा

Advertisement

यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी तसेच रामटेकचे खासदार कृपाल तुमाने या दोन बंडखोर खासदारांना धडा शिकवण्यासाठी पक्षाची विशेष रणनीती उद्धव ठाकरे यांनी आखली असल्याची चर्चा आहे. या माध्यमातून या बंडखोर खासदारांना धडा शिकवण्यासाठी या मतदार संघातील उच्छुकांची चाचपणी देखील उद्धव ठाकरे या आढाव्याच्या माध्यमातून करणार आहेत.

बैठकीत कोणाची उपस्थिती

Advertisement

उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीसाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावले आहे. यामध्ये या लोकसभा मतदारसंघाचे संपर्क नेते, स्थानिक नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, खासदार, आमदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुखा पासून तालुकाप्रमुख आणि शहर प्रमुखांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

बैठकीनंतर समजणार रणनीती

Advertisement

वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात पक्षाची ताकद आणखी वाढवण्यासाठी या माध्यमातूमन प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिंदे गटात गेलेल्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी ठाकरे कोणती रणनीती आखतात हे या बैठकीनंतर समजणार आहे.Source link

Advertisement