‘उदयनराजेंना कलाकारांची जाण’: महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारे तुम्ही दोघे..त्यावर गौतमी म्हणाली – दादा खूप मोठे अन् मी लहान


सातारा26 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

”उदयनराजे म्हणजे दादा खूप मोठे आहे, त्यांच्यासोबत माझे नाव घेऊ नका. मी खूप छोटी आहे. त्यामुळे अजितबात तुलना किंवा असे काही म्हणू नका. मी एक कलाकार आहे आणि त्यांना कलाकारांची जाण आहे. पुढच्या महिन्यात घुंगरू चित्रपट रसिकांना पाहता येणार असल्याची प्रतिक्रीया आपल्या दिलखेचक अदांनी घायाळ करणारी नर्तकी गौतमी पाटील हिने दिली.

Advertisement

सातारा येथे तिने उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रीया दिली.

मी त्यांचा आशीर्वाद घेतला

Advertisement

गौतमी पाटील म्हणाली, खूप छान वाटले महाराजांना (उदयनराजेंना) भेटून मी त्यांना पहिल्यांदाच भेटले. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना आज भेटले आहे. आज त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यासाठीच मी आज आले होते.

दादांना परफ्यूम दिला

Advertisement

गौतमी पाटील म्हणाली, पुढच्या महिन्यात लवकरच घुंगरू चित्रपट पाहण्यास मिळणार आहे. दादांना परफ्यूम खूप आवडतो मी येता येता परफ्यूम घेतला आणि त्यांना बुके दिले. महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारे उदयनराजे आणि गौतमी पाटील हे दोघे आहेत तुम्हाला हे ऐकून कसे वाटते यावर गौतमी पाटील यांनी म्हटले की, उदयनराजे म्हणजे दादा खूप मोठे आहे त्यांच्यासोबत माझे नाव घेऊ नका आणि मी खूप छोटी आहे. त्यामुळे अजितबात तुलना किंवा असे काही म्हणू नका. मी एक कलाकार आहे. ते आपल्या सर्वांना बघतात. ते आपले दैवत आहे. त्यांना भेटून छान वाटले.

गौतमीविरोधात तक्रार अर्ज

Advertisement

नृत्यांगणा गौतमी पाटील विरोधात बार्शीत पोलिसात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. बार्शीतील कार्यक्रमाचे आयोजकांनी बार्शी पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे.

अवांतर मानधन घेतल्याचा आरोप

Advertisement

12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र गौतमी पाटील 7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्याने कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला. या कार्यक्रमासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरून गौतमी पाटील यांनी अवांतर पैसे घेतले असा तक्रारदाराचा आरोप आहे.Source link

Advertisement