उत्सव: श्री कालिका माता मंदिरामध्ये‎ सुवर्ण लेपित कलशारोहण साेहळा‎


अकोला‎22 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आराध्य दैवत श्री राजराजेश्वर‎ मंदिरातील कालिका देवी मंदिराचा‎ सुवर्ण लेपित कलशारोहण‎ सोहळ्यानिमित्त आयोजित शतचंडी‎ महायज्ञाला सुरुवात झाली‎ या शतचंडी महायज्ञाला‎ रविवारी, २२ जानेवारी रोजी गणपती‎ पूजन, मंडप पुजन, स्वस्ती पुण्याह‎ वाचन, देवता स्थापना करुन‎ उत्साहात प्रारंभ झाला.‎ उत्सवाअंतर्गत साेमवार ते‎ गुरुवारपर्यंत दररोज सकाळी ८ ते‎ दुपारी २ पर्यंत शतचंडी पाठ व हवन‎ होणार अाहे. गुरुवारी २६ जानेवारी‎ रोजी श्री कालिका देवी मंदिरावर‎ सुवर्णलेपीत कलशारोहण होवून‎ शतचंडी यज्ञाची पुर्णाहूती होणार‎ आहे. या निमित्ताने दुपारी ११ ते २‎ पर्यंत महाप्रसाद आयोजित केला.‎ दरराेज दुपारी ३.३० ते ५.३०‎ वाजतापर्यंत भजन-प्रवचनही‎ आयोजित केले . या‎ कलशारोहणानिमित्त आयोजित‎ शतचंडी यज्ञाचा भाविकांनी‎ दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री‎ राजराजेश्वर संस्थान व श्री‎ कालिका देवी जोगवा उत्सव‎ समितीच्यावतीने केले आहे.‎

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement