उत्तराखंड निवडणूक 2022: आम आदमी पार्टीमुळे लढाईत रंगत, भाजप-काँग्रेसने बदलली रणनीती


  • Marathi News
  • National
  • Uttarakhand Election 2022 | Marathi News | Due To Aam Aadmi Party, BJP Congress Changed Its Strategy

Advertisement

डेहराडून / मनमीत16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये थंडीचा कडाका वाढू लागला आहे. तितक्याच वेगाने राजकीय वातावरणही तापू लागले आहे. यंदा भाजप, काँग्रेससोबतच आप देखील रिंगणात आहे. उत्तराखंडमध्ये भाजपने तीन मुख्यमंत्री बदलले. त्यावरून काँग्रेस सातत्याने हल्ला करत होती. काँग्रेसमध्येही रस्सीखेच आहे. अरविंद केजरीवाल यांनी तीनशे युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपला नवी रणनीति तयार करावी लागली आहे. भाजपने राज्याला आंदोलकांना निवृत्तीवेतन, पोलिस तसेच शिक्षकांसाठी देखील आकर्षक घोषणा केली आहे. काँग्रेसने राजधानीच्या मागणीसह अनेक मुद्यांवर आश्वासने दिली. राज्य स्थापनेच्या वीस वर्षांनंतरही स्थलांतर कमी होण्याऐवजी वाढले आहे. हाच निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा आहे.

Advertisement

उत्तरकाशीतून सरकार
उत्तराखंडमध्ये एक परंपरा दिसून येते. उत्तरकाशीची जागा जिंकणाऱ्या पक्षाचेच राज्यात सरकार स्थापन होते, अशी लोकांची धारणा आहे. १९५२, १९५७ मध्ये जयेंद्र बिष्ट व १९५८ मध्ये जयेंद्र सिंह यांना पुन्हा १९७७ मध्ये जुवांठामुळे संधी मिळाली होती. त्याशिवाय शिक्षण मंत्री होणारा उमेदवार नंतरची निवडणूक हारतो.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement