ईडीच्या पैशातून सोमय्यांना कमिशन मिळते: माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा


छत्रपती संभाजीनगर27 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

ईडीच्या पैशातून भाजपचे नेते किरीट सोमय्यांना कमिशन मिळत असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Advertisement

जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ईडीच्या पैशातून सोमय्या यांना कमिशन मिळेल. हे असेच असतात. इन्कम टॅक्सला ज्या खबऱ्याने माहिती दिली, त्या खबऱ्याला त्यांना काहीतरी द्यावे लागत असते. तसेच याचे काम आहे, ईडीच्या कारवाईबाबत भाजपच्या माणसाला कसे काय कळते की, उद्या कोणाकडे धाड पडणार आहे, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. या सर्व मिलीभगतमधून भाजपचे लोक नागरिकांना आणि विरोधकांना त्रास देत आहे, असा आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

चंद्रकांत खैरे पुढे बोलताना म्हणाले की, सरकार येतात आणि जातात, पुढे किरीट सोमय्यांचे काय होते ते पाहा असा इशारा देताना त्यांनी सोमय्यांची अनेक लफडी आहेत असे म्हणत सोमय्यांना इशारा दिला आहे.

Advertisement

दापोलीतील साई रिसाॅर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

सोमय्या काय बोलणार?

Advertisement

चंद्रकांत खैरे यांनी यापूर्वी देखील किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप करत खोचक शब्दात टीका केली आहे. खैरे यांच्याकडून सोमय्यांचा नेहमी अरे तुरेने उल्लेख केला जातो. मात्र जालना येथे बोलताना खैरे यांनी ईडीच्या पैशातून सोमय्यांना कमिशन मिळते असा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे आता खैरे यांच्या आरोपाला सोमय्या काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement