इशान किशन भडकला म्हणाला, ‘ख्रिस गेलला पण सेट व्हायला वेळ लागतो’ नक्की त्यामागचे कारण काय…

ईशान किशन भडकला म्हणाला, ‘ख्रिस गेलला पण सेट व्हायला वेळ लागतो’ नक्की त्यामागचे कारण काय...
ईशान किशन भडकला म्हणाला, ‘ख्रिस गेलला पण सेट व्हायला वेळ लागतो’ नक्की त्यामागचे कारण काय...

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ मेगा लिलावात इशान किशनला विक्रमी १५ कोटी २५ लाखात विकत घेले. पण या हंगामात ३७० धावा करून, किशन मुंबईचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ च्या लिलावात सर्वात महागडा ठरलेला इशान किशन अपेक्षेवर खरा उतरू शकला नाही पण मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक फलंदाज त्याच्या फॉर्मबद्दल चिंतित नाही आणि म्हणाला की केव्हा ना तरी सर्वोत्तम खेळाडूंना देखील वाईट गोष्टींना सामोरे जावे लागले आहे.

इशानला मुंबई इंडियन्सने १५ कोटी २५ लाख रुपयांत लिलावात खरेदी केले होते, मात्र तो १३ सामन्यांत ३०.८३ च्या सरासरीने केवळ ३७० धावा करू शकला. मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या तीन धावांनी पराभव झाल्यानंतर इशान म्हणाला, “सर्वोत्तम खेळाडूंनाही संघर्ष करावा लागला आहे. ख्रिस गेलला सेटल व्हायला वेळ देतानाही मी पाहिले आहे.”

Advertisement

तो म्हणाला, “प्रत्येक दिवस नवीन असतो आणि प्रत्येक सामना नवीन असतो. कधी चांगली सुरुवात होते तर कधी विरोधी गोलंदाज तयारीनिशी उतरतात. ड्रेसिंग रुममधील रणनीती बाहेरच्या लोकांना हव्या त्यापेक्षा वेगळी असते.” त्याने पुढे म्हटले, “क्रिकेटमध्ये हे कधीच निश्चित नसते की तुमची एकच भूमिका असते आणि तुम्ही मैदानात उतरताच चेंडू मारायला सुरुवात कराल. जर तुम्ही संघाचा विचार करत असाल तर तुमची भूमिका स्पष्ट असणे गरजेचे आहे.”

आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १३ पैकी १० सामने गमावले आहेत. रोहित शर्माच्या मुंबईचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त एकच सामना शिल्लक आहे आणि सध्या १०-संघाच्या आयपीएल २०२२ पॉइंट टेबलमध्ये फक्त सहा गुणांसह ते तळाशी बसलेले आहेत. आयपीएलच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझीच्या यावर्षीच्या संघर्षामागील एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचा यष्टिरक्षक-सलामी फलंदाज इशान किशनचा खराब फॉर्म आहे. इशान या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. किशनवर वरचढ ठरत टिळक वर्मा पदार्पणाच्या आयपीएलमध्ये मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

Advertisement

सतत आठ सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने आधीच आयपील २०२२ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. सलग दुसऱ्या वेळी मुंबई प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरली आहे. गेल्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स पाचव्या क्रमांकावर राहिली होती.

Advertisement