इशान किशन खूप झालं आज तरी त्याला डच्चू देणार का मुंबई इंडियन्स, काय असेल प्लेईंग इलेवन

इशान किशन खूप झालं आज तरी त्याला डच्चू देणार का मुंबई इंडियन्स, काय असेल प्लेईंग इलेवन
इशान किशन खूप झालं आज तरी त्याला डच्चू देणार का मुंबई इंडियन्स, काय असेल प्लेईंग इलेवन

सर्वाधिक महागडा खेळाडू असलेला इशान किशन हा सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरत आहे. फ्लॉप ठरणाऱ्या इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सकडे भन्नाट पर्याय उपलब्ध आहे आणि उद्याच्या सामन्यात मिळू शकते संधी. मुंबईच्या संघाकडे एक असा खेळाडू आहे की जो यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडूच शकतो, पण त्याचबरोबर सलामीलाही तो येऊ शकतो. हा खेळाडू आहे तरी कोण पाहा…

आयपीएलच्या लिलावात सर्वात जास्त रक्कम ही मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी खर्च केली. पण या आयपीएलमध्ये इशान हा सातत्याने अपयशी ठरत आहे. गेल्या सामन्यात तर इशान हा माघारी परतण्याची घाई करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता नवव्या सामन्यात अपयशी ठरणाऱ्या इशान किशनला संघातून डच्चू दिला जाऊ शकतो. पण इशानला संघाबाहेर केलं तर मुंबई इंडियन्सकडे कोणता पर्याय आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. पण मुंबई इंडियन्सने या गोष्टीचा पर्याय शोधून काढला आहे. इशानला जर संघाबाहेर काढवे तर यष्टीरक्षण आणि सलामीसाठी मुंबईच्या संघाकडे एक भन्नाट पर्याय आहे.

Advertisement

इशान किशनला कोणता खेळाडू ठरू शकतो पर्याय, पाहा…

इशान किशनला संघाबाहेर केलं तर यष्टीरक्षणाची जबाबदारी कोण सांभाळणार, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला असेल. पण मुंबईकडे आता इशानसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. मुंबई इंडियन्सने लिलावात इशानसाठी पर्याय शोधून काढला आहे. इशानला न खेळवण्याचा निर्णय जर मुंबई इंडियन्सने घेतला तर आर्यन जुयाल हा यष्टीरक्षण आणि सलामीची जबाबदारी सांभाळू शकतो. मुंबई इंडियन्सने २० लाख रुपये मोजत आर्यनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते, पण तो इशान किशनसाठी यष्टीरक्षण आणि सलामीवीर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडू शकतो.

Advertisement

आर्यन हा उत्तराखंडचा २० वर्षीय खेळाडू आहे आणि आतापर्यंत त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारताच्या युवा (१९-वर्षांखालील) संघातही तो खेळला आहे. एक निष्णात यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज, अशी त्याची ओळख आहे. आर्यन हा उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळतो. उत्तर प्रदेशचा एक स्थानिक सामना दिल्लीबरोबर झाला होता. या सामन्यात आर्यनने नाबाद १२० धावांची खेळी साकारली होती. त्याचबरोबर आर्यन हा सलामीला येऊन तुफानी फटकेबाजी करू शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सला इशानसाठी आता एक चांगला पर्याय मिळालेला आहे. पण मुंबई इंडियन्सचा संघ आर्यनला कधी संधी देणार याची उत्सुकता आता सर्वांना असेल.

Advertisement