इलेक्शन अपडेट: सहकार क्षेत्रात दबदबा असलेल्या नांदगाव खरेदी विक्री संस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय


अमरावती11 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नांदगाव खंडेश्वर तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला असून सर्व पंधराही जागा सहकार पॅनलने जिंकल्या आहेत. सहकार पॅनलचे ९ संचालक पूर्वीच अविरोध विजयी झाले होते. उर्वरित ६ संचालकाच्या जागांसाठी निवडणूक पार पडली.

Advertisement

या निवडणुकीत दिवंगत शालिकराम खंडार यांच्या नावाने प्रसिद्ध असलेला गट, मानकचंद जैन गट व अभिजीत ढेपे यांचा गट यांनी एकत्र येऊन सहकार पॅनल गठित केले होते. विजयी संचालकांमध्ये अविरोध विजयी झालेले वैयक्तिक भागधारक प्रवर्गातील परीक्षित ठेकेकर, बळीराम वाट, पुंडलिक रिठे, गजानन ढवळे व प्रभाकर काळमेघ, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील समीर दहातोंडे, महिला प्रतिनिधी वैशाली रिठे व स्मिता सावदे, अनुसूचित भागधारक प्रवर्गातील नागोराव शिंदे यांचा समावेश आहे.

दरम्यान मतदानाअंती विजयी झालेल्यांमध्ये संस्थांतर्गत मतदारसंघातील सुरेंद्र खापरी, मनोहर चोरे, संजय देवतळे, विजय पाटेकर व भालचंद्र रोहणेकर यांचा समावेश असून भटक्या जमाती प्रवर्गातून दिनेश गिरी यांनी विजय संपादन केला. विजयानंतर गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. संस्थेचे व्यवस्थापक अमोल खंडार यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले.

Advertisement

सहकार पॅनलचे सर्व संचालक विजयी करण्यासाठी सहकार क्षेत्रातील पुढारी अभिजीत ढेपे, मानकचंद जैन, विलास सावदे, अशोक खंडार, विलास पाटील चोपडे, प्रमोद ठाकरे, संदीप कणसे, अशोक ढेपे, विनोद ठाकरे, मनोज काळपांडे, संजय कनसे आदींचे सहकार्य मोलाचे ठरले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement