सोलापूर26 मिनिटांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
महापालिका आवारातील इंद्रभुवन इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम संपले असून, २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी इमारत नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण इंद्रभुवन समोरील पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांच पुतळ्यासमोर करण्यात येणार आहे.
Advertisement
बुधवारी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी परिसराची पाहणी केली. इंद्रभुवन इमारत सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे पाहता यावी यासाठी वाॅल कंपाऊड नसणार आहे, नागरिकांना बसण्याची सोय करण्यात येणार आहे.
इंद्रभुवन इमारत नूतनीकरण स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने करण्यात आले असून, ५.१५ काेटी रुपये खर्च करण्यात आला. त्यातून नूतनीकरण केलेले इमारत मुळ रूपात आल्याची माहिती आर्किटेक पंडित मुन्शी यांनी दिली. दिव्य मराठीसाठी पप्पू जमादार यांनी टिपलेले छायाचित्र.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement