पुणे30 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पुण्यात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख करुन, तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अभय रविंद्र चाैधरी (रा.उत्मतनगर,पुणे) या आराेपीवर पोलिसांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात बलात्कारासह पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती साेमवारी दिली आहे.
याबाबत पीडित 15 वर्षाच्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते डिसेंबर 2022 यादरम्यान घडलेला आहे. पीडित मुलगी व तरुणाची ओळख ही फेब्रुवारी 2022 मध्ये इन्स्त्ताग्रामवर झालेली हाेती. त्यानंतर तरुण मुलीस वेळाेवेळी भेटुन त्याने फेब्रुवारी 2022 च्या शेवटच्या आठवडयात मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणुन, ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिचे इच्छे विरुध्द जबरदस्तीने लैंगिक संबंध केले. मुलीने याबाबत विलंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने याप्रकरणी उशीरा तक्रार दाखल केली आहे.
इन्स्टाग्रामवर तरुणीचा बदनामीचा प्रकार
पूुण्यातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीस 20/7/2022 ते 21/7/2022 यादरम्यान ‘रेहानिटेक्स.रेहान ’ या इन्स्टाग्राम आयडीवरुन तिच्या व तिच्या बहिणीच्या व एका मित्राच्या इन्स्टाग्राम आयडीवर लैंगिक भावना उत्तेजीत करणारे अश्लिल मेसेज संबंधित इन्स्टाग्राम पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी संबंधित इन्स्टाग्राम आयडीधारकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस प्रवासात 16 वर्षीय मुलीचा विनयभंग
नळस्टार्प पासून काेथरुड डेपाेपर्यंत बसने प्रवास करत असलेल्या 16 वर्षीय मुलीचा एका तरुणाने पाठलाग करुन, तिच्या साेबत बाेलण्याचा बहाणा करुन माझेसाेबत मैत्री करशिल का असे विचारले. त्यानंतर तिची इच्छा नसताना तिचा हात धरुन, तुला उद्या माझ्याकडून चहाची पार्टी देताे असे सांगितले. त्यानंतर 14 जानेवारी राेजी पुन्हा तिच्यावर लक्ष्य ठेवुन ती बसने जात असताना, बसमध्ये तिला धक्के मारुन वेगवेगळे हातवारे करुन तिचा पाठलाग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत मुलीने काेथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी आराेपी प्रेम चंदु पवार (वय-29,रा.पिरगुंट,पुणे) या आराेपीस अटक केली आहे.