नागपूर36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
इंडिया’मध्ये प्रत्येक पार्टीचा नेता पंतप्रधानपदाचा दावेदार आहे. सगळ्यांना आपण पंतप्रधान व्हावेसे वाटते. पंतप्रधानपदाच्या नावावरून त्यांचे एकमत होऊ शकत नाही. त्यामुळे एनडीएला फारशी चिंता करण्याचे कारण नाही. 2024 मध्ये मोदीच पंतप्रधान होतील असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
इंडिया आघाडी निगेटिव्ह आघाडी आहे. चुकीच्या पद्धतीने झालेली ही आघाडी आहे. मोदींसमोर याचा टिकाव लागणे अशक्य आहे. इंडिया आघाडीमध्ये केजरीवाल जाईल की नाही हे सांगता येत नाही असे आठवले म्हणाले. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. कांद्याला चांगला भाव मिळावा, अशी अनेक दिवसांची मागणी आहे असे सांगतानाच “महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकत आहे कांदा आणि महाविकास आघाडीचा झाला आहे वांदा असे म्हणत केंद्राच्या निर्णयाचे समर्थन केले.
आम्हाला दोन जागा मिळाव्या
महायुतीमध्ये आरपीआला दोन जागा मिळाल्या आणि त्या निवडून आल्या तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल. म्हणून आम्हाला दोन जागा मिळाव्या अशी आमची मागणी आहे. मला शिर्डीतून संधी मिळावी अशी तेथील लोकांची इच्छा आहे. म्हणून मला शिर्डीमधून उमेदवारी मिळावी माझी इच्छा आहे असे आठवले यांनी सांगितले.
शरद पवारांनी एनडीएसोबत यावे
संजय राऊत मुंबई से लढना चाहते हैं लेकीन हम आगे बढना चाहते हैं असे आठवले म्हणाले. मी शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याचे आवाहन केले होते. त्याआधी पवारांनी भाजपला समर्थन दिले आहे. असे असले तरी शरद पवार यांनी देशहितासाठी एनडीएसोबत यायला हवे. मी देखील काँग्रेस, एनसीपी सोबत राहून पुन्हा एनडीएमध्ये आलेलो आहे. राजकारणात कॉमन मिनिमन अजेंड्यावर एकत्र यायला पाहिजे. अजित पवार गटाने ठाणे रुग्णालयावरून एकमेकांवर कुरघोडी करू नये. आणि पवारांनी राहुल गांधींच्या नादाला लागू नये असेही ते म्हणाले.