इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दमदार कामगिरीसाठी सज्ज


भारताचे बॅडिमटनपटू बी. साईप्रणीत, ध्रुव रावत यांनी करोनाची बाधा झाल्याने या स्पर्धेतून माघार घेतली

Advertisement

नवी दिल्ली : जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदम्बी श्रीकांत आणि दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हे आघाडीचे भारतीय खेळाडू मागील हंगामाच्या अखेरीस सापडलेली लय कायम राखत मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत दमदार कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत.

करोनामुळे दोन वर्षे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे होणाऱ्या या स्पर्धेवर यंदाही करोनाचे सावट आहे. भारताचे बॅडिमटनपटू बी. साईप्रणीत, ध्रुव रावत यांनी करोनाची बाधा झाल्याने या स्पर्धेतून माघार घेतली. परंतु बरेच आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

Advertisement

श्रीकांत आणि सिंधूसह विश्वविजेता लोह किन येव, तीन वेळा विश्वविजेती जोडी मोहम्मद एहसान आणि हेंद्रा सेतिवान, तसेच ओंग येव सिन, टेओ ए यि यांसारखे आघाडीचे खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत. पुरुषांमध्ये पहिल्या फेरीत श्रीकांतपुढे भारताच्याच सिरिल वर्माचे आव्हान असेल. लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचे अनुक्रमे इजिप्तचा अदहम एल्गामल आणि स्पेनचा पाब्लो एबियन यांच्याशी सामने होतील. महिलांच्या पहिल्या फेरीत सिंधूसमोर श्री कृष्णा प्रिया कुदारवल्लीचे आव्हान असेल. तसेच दोन वेळा विजेत्या सायना नेहवालचेही या स्पर्धेतून बॅडिमटन कोर्टवर पुनरागमन होईल.

श्रीकांत, सिंधूला अग्रमानांकन

Advertisement

श्रीकांत आणि सिंधू या माजी विजेत्यांना यंदा इंडिया खुल्या स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी गटात अग्रमानांकन लाभले आहे. पुरुषांमध्ये जेतेपदासाठी श्रीकांत, येव आणि लक्ष्य यांच्यात स्पर्धा आहे. महिलांमध्ये २०१७च्या पर्वाच्या विजेत्या सिंधूला सायना, थायलंडची बुसानन ओंगबमरुंगपान आणि सिंगापूरची जिया मिन येओ या खेळाडू रोखण्याचा प्रयत्न करतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Advertisement

Source link

Advertisement