इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन: अधिवेशनाच्या निमित्ताने महा यूथकॉनचे आयोजन; अनेक डाॅक्टरांचे व्याख्याने होणार


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • State Level Convention Of Indian Medical Association, Organizing Maha YouthCon On The Occasion Of The Convention; Lectures By Many Doctors Will Be Held

नाशिक9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दूसरे राज्य स्तरीय अधिवेशन हे नाशिकरोड शाखेच्या वतीने 21 व 22 जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आले आहे. हे अधिवेशन नाशिक पुणे महामार्गावरील हाॅटेल क्वालिटी इन मध्ये सकाली 9 ते सांयकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार असल्याचे नाशिकरोड शाखेचे अध्यक्ष डाॅ. प्रशांत भुतडा आणि सचिव डाँ. रेश्मा घोडेराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement

आयएमएचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन होत असुन यंदा या अधिवेशनाचा मान नाशिकरोड शाखेला मिळाला आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने महा यूथकॉन 21 व 22 जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील युवा या विषयाशी निगडित या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले असुन शनिवारी अधिवेशन उदघाटन सोहळा होणार आहे. यासाठी आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे हे अध्यक्षस्थानी रहाणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या डॉ. केतकी पाटील या रहाणार आहे.

यासाठी राज्याभरातील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे डॉ. भुतडा यांनी सांगितले.शनिवारी सकाळच्या सत्रात डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खेल उत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजे पासून अधिवेशनास सुरवात होवून वेग वेगळ्या वैद्यकीय विषयांवर मार्गदर्शन पर व्याख्याने होणार आहेत.तसेच संध्याकाळी युवा आयकॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत विविध नामकिंत डॉक्टरांचे व्याख्याने होणार आहे. दुपारी राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांचे डीन कॉनक्लेव संमेलन होणार आहे. यावेळी खजिनदार डॉ. सारंग दराडे, डॉ. विजय कऱ्हाडे, डॉ. प्रवीण जाधव, डॉ. ज्योत्स्ना डुंबरे, डॉ. शीतल जाधव, डॉ. मयूर सरोदे, डॉ. कैलास मोगल, डॉ. कांचन लोकवानी, डॉ. मानसी गुजराती, डॉ. सुषमा भुतडा, डॉ. प्रशांत मुठाळ हे डॉक्टर उपस्थित होते.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement