इंग्लिश खाडीत बोट बुडाली; ब्रिटनला जाणारे 31 निर्वासित ठार


  Advertisement

  Migrant boat capsizes in English Channel : फ्रान्समधून ब्रिटनमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 31 निर्वासितांचा बुडून मृत्यू झाला. हे निर्वासित इंग्लिश खाडीतून प्रवास करत होते. त्या दरम्यान त्यांची बोट उलटली. ही दु:खद मोठी घटना असल्याचे फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी म्हटले. 

  निर्वासितांच्या बोटीला अपघात झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपात्कालीन बैठक बोलावली. या घटनेची माहिती मिळताच, कॅलेस बंदरावर पोलीस, रुग्णवाहिका आणि आपात्कालीन सेवा दाखल करण्यात आल्या. तर, गृहमंत्री जेराल्ड दरमानिन यांनी सांगितले की, या बोटीत 34 जण होते. त्यातील 31 जणांचे मृतदेह आढळले असून दोन जण जिवंत  आहेत. तर, एक जण बेपत्ता आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत फ्रान्स आणि ब्रिटनकडून संयुक्तपणे मदत आणि बचाव कार्य सुरू होते. 

  Advertisement

  या घटनेप्रकरमी चार संशयित मानवी तस्करांना बुधवारी अटक करण्यात आले आहे. नौकेतील निर्वासित प्रवासी कोणत्या देशातील होते, याची माहिती देण्यात आली नाही. 

  बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक

  Advertisement

  मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार, शांत असलेल्या समु्द्राचा फायदा घेण्यासाठी ब्रिटनला जाणाऱ्या निर्वासितांची संख्या अधिक होती. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक जण असल्याचा दावा करण्यात येत आहे. एका मच्छिमाराला अपघातग्रस्त बोट दिसली. या बोटीच्या भोवती काही लोकं दिसली. मात्र, त्यांच्या शरिराची हालचाल दिसून आली नाही.

   

  Advertisement  Source link

  Advertisement

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here