इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक सिल्व्हरवूड यांना करोनामेलबर्न ; इंग्लंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांना करोनाची लागण झाली असून ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी संघासह नसतील, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) जाहीर केले.

Advertisement

होबार्ट येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीपूर्वी सिल्व्हरवूड करोनातून सावरतील असे अपेक्षित आहे. कुटुंबातील अन्य सदस्यालाही करोना झाल्यामुळे सिल्व्हरवूड सध्या घरातच विलगीकरण करत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत साहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थोर्प इंग्लंडला मार्गदर्शन करतील. रविवारी सकाळी इंग्लंडच्या संघाचे सराव सत्रही रद्द करण्यात आले. सराव गोलंदाजांपैकी एकाला करोनाची बाधा झाल्यामुळे त्यांचे सराव सत्र स्थगित झाले. त्यामुळे एकूणच उभय संघांतील चौथ्या कसोटीवर करोनाचे सावट निर्माण झाले आहे.

मॅकग्राला करोनाची लागण

Advertisement

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राला करोनाची लागण झाली आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात ५ जानेवारीपासून सिडनी येथे होणारी कसोटी ‘पिंक टेस्ट’ म्हणून ओळखली जाते. मॅकग्राची पत्नी जेन हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ कर्करोगबाधित रुग्णांसाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने ही कसोटी खेळवण्यात येते. मॅकग्रा या संस्थेचा संस्थापक असून सामन्याच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमासाठी तो उपलब्ध असण्याची शक्यता कमी झाली आहे.

The post इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक सिल्व्हरवूड यांना करोना appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement