आ. हरिभाऊ बागडेंचा आक्षेप: निवडणूक अधिकाऱ्यांनी औरंगाबाद बाजार समितीची प्रारुप मतदार यादी जाहीर करण्याची घाई केली


प्रतिनिधी | औरंगाबाद8 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबादची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अनिल दाबशेडे घाई करीत आहेत. औरंगाबाद तालुक्यातील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटींच्या सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली नाहीत. दाबशेडे हेतुपुरस्सर नवीन सदस्यांची नावे समाविष्ट करण्याचे टाळत असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दाबशेडे यांना बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ठेवण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.

Advertisement

तालुक्यात ७६ सोसायट्यांचे ९८८ मतदार सभासदआहेत. १३ जानेवारीला प्रसिद्ध बाजार समिती मतदार यादीत यातील ६४७ सभासदांचा समावेश करण्यात आला असून अद्याप ३४१ सभासद समाविष्ट नाही. २२ सप्टेंबरनंतर २७ सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या. यातील ३५१ सभासदांची नावे अंतिम करावी. १ एप्रिल २२ ते ३१ डिसेंबर २२ पर्यंत ८ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. औरंगाबाद तालुक्यातील ११५ ग्रामपंचायतींची मतदार यादी प्रसिद्ध केली. परंतु १८ डिसेंबरला झालेल्या ३६ ग्रामपंचायत सभासदांचा मतदार यादीत समावेश केला नाही. प्रलंबित मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत घेतल्याशिवाय निवडणूक घेऊ नये, अशी मागणी आमदार हरिभाऊ बागडेंनी केली.

दाबशेडेंच्या संगनमतीने प्लॉट विक्री

Advertisement

आमदार हरिभाऊ बागडे यांनी आरोप केला की, दाबशेडे यांनी बाजार समितीचे प्रशासक म्हणून पदभार घेतल्यानंतर रॉकेल व्यापाऱ्यांना प्लॉट देण्याची घोषणा केली. बाजार समितीचे प्लॉट शेतकऱ्यांसाठी आहेत. त्यांनी नंतर त्यांना शेतकरी म्हणून दाखविले. आमच्या संचालक मंडळाच्या काळात ४७५ रूपये चौरस फूट दराने प्लॉट विक्री केले. दाबशेडे यांनी ७५ रू. चौरस फूट दराने विक्री केले. यात साडेचार कोटींचे बाजार समितीचे नुकसान झाले उर्वरित किंमत असून दाबशेडे यांनी प्लॉट धारकांकडून वसूल करावी

जिन्सी जमीन व्यवहाराचे धनादेश

Advertisement

जिन्सीच्या जमिनीच्या नोंदणीस आधी परवानगी दिली आणि पुढच्या तारखेचे धनादेश घेतले. सहा कोटी ६४ लाखांच्या रक्कमेचा धनादेश अनादरीत झाला. आता रजिस्ट्री रद्द करण्यासाठी गेल्यानंतर धनादेश अनादर झाल्याचा भुर्दंड बाजार समितीला बसायला नको अशी अपेक्षा आ. बागडेंनी व्यक्त केली. एवढ्या रक्कमेचा पुढचा तारखेचा धनादेश स्विकारायला नको होता. त्यानंतर पुन्हा दाबशेडे यांनी नवीन धनादेश स्विकारला आणि तोही अनादर झाला, असे हरिभाऊ बागडे म्हणाले

नवीन मतदारांचा समावेश होईल

Advertisement

याबाबत सहकारी संस्तेचे जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांनी सांगितले की, सभासदांच्या मतदार यादीत समावेशासाठी नवीन अधिसूचना जारी होईल आणि त्यानंतर अंतिम यादीत समावेश होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कायद्याने मलाच राहावे लागेल. जिन्सी जमिनीच्या धनादेशाचा भुर्दंड बाजार समितीला भोगावा लागणार नसून शौर्या संस्थेकडून रक्कम वसूल केली जाईल.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement