अकोला23 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबाबत चुकीचा इतिहास सांगितला आहे, असा दावा करीत एमआयएमने शुक्रवारी निदर्शने काढली. आंदाेलकांनी घाेषणाही दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आव्हाड यांचा छायाचित्र धरत एमएमआयने निषेध नाेंदवला आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
महापुरुषांबाबत काही नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत असून, राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. राजकीय नेते एकमेकांवर राजकीय कुरघाेडीची संधी साधत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे येथील नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबबाबत भाष्य केले. एमआयएमने 13 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
मुस्लिम धर्माचा भावना दुखावल्या
‘आव्हाड यांनी ओरंगजेबबाबत अपशब्द वापरल्याने मुस्लिम धर्माचा भावना दुखावल्या आहेत’, असे निवेदनात नमूद करण्यात आले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. निदर्शने करताना एमआयएमचे अध्यक्ष इरखान खान (युथ विंग), आसिफ खान, जावेद खान, रियाज अहमद कान, शेख हमजा, माे. सद्दाम, माे. अजहर आदी हाेते.
वारंवार अपशब्द
सप्टेंबर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे येथील दुसरे नेते आनंद परांजपे यांनीही औरंगजेबबाबत प्रथम चुकीचे वक्तव्य केल्याचे एमएमआयएचे म्हणणे आहे. त्यावेळीही आम्ही आंदाेलन करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली हाेती. मात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे वारंवार चुकीचा इतिहास सांगण्यात येत असल्याचा दावा एमआयएमने केला आहे.
पोेलिस सतर्क
एमएआयएमकडून जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी निवेदनासह अन्य माहिती जाणून घेतली.