अकोला9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
श्री शिवमहापुराण कथा व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सवाचे आयोजन ५ ते ११ मे दरम्यान म्हैसपूर अकोला येथे केले आहे. या कथा महोत्सवाची प्रथम निमंत्रण पत्रिका ही रविवारी, १२ मार्चला अकोला नगरीचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात व तद्नंतर बारा ज्योर्तिलिंग मंदिर रणपिसे नगर येथे अर्पण करण्यात आली. निमंत्रण पत्रिका अर्पण करण्याकरता टिळक रोड स्थित माणिक टॉकीज जवळील अर्जुन समाज बहुउद्देशीय व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथून सुरुवात होवून टिळक रोड, मोठे राम मंदिर, सिटी कोतवाली, लोखंडी पुल, जयहिंद चौक मार्गे श्री राजराजेश्वर मंदिरामध्ये पोहोचून प्रथम निमंत्रण पत्रिका देण्यात आली. या वेळी पालखीमध्ये श्री गणेशाची मूर्ती स्थापित करून पारंपारीक वाद्यवृंदाच्या गजरामध्ये व महिला- पुरुषांच्या उपस्थितीमध्ये निमंत्रण पत्रिका देण्यात आली.
या वेळी जयहिंद चौकामध्ये सद्गुरु परिवाराच्या वतीने निमंत्रण पत्रिका सोहळ्यामध्ये उपस्थितीत सर्व शिवभक्तांना पाणी व आईस्क्रीमचे वितरण करण्यात आले. त्यानंतर शास्त्री नगर स्थित शेतकरी दूध डेअरी येथून सोहळ्याला सुरुवात होवून शास्त्री नगर, रणपिसे नगर चौक मार्गे रणपिसे नगर स्थित बारा ज्योर्तिलिंग मंदिरामध्ये महिला- पुरुषांच्या उपस्थितीमध्ये निमंत्रण पत्रिका ही बारा ज्योर्तिलिंग मंदिरामध्ये देण्यात आली.
यानंतर कुलदैवतेला सुद्धा निमंत्रण पत्रिका देण्यात आली. या वेळी शिवभक्तांसह आयोजक मंडळी उपस्थित होती. यानंतर जिल्ह्याच्या प्रथम नागरिक जिल्हाधिकारी नीमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, वन विभागाचे उपवनसंरक्षक के. अर्जुना यांना सुद्धा या वेळी निमंत्रण पत्रिका देण्यात आली. या वेळी श्री शिवमहापुराण कथा येथे स्टॉल बुकींगकरता संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.