आळशीपणामुळे होते खूप नुकसान. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा.

Image Source: mountainvistapsychology.com

आळशीपणामुळे खूप नुकसान होते.. हे कळतंय पण वळत नाहीये का..?? बघूया आळशीपणा कसा दूर करायचा..

लहानपणी ‘लेझी मेरी’ चे बडबडगीत / कविता सगळ्यांनीच ऐकले आहे..

Advertisement

मात्र हे बडबडगीत आपल्याला अजूनही लागू होतेय का..?? पण कसे ओळखायचे हे..? सोप्पे आहे.. स्वतःला हे प्रश्न विचारून पहा:

  • कोणतेही काम करायचे अतिशय जीवावर येते का..??
  • थोडावेळ झोपू किंवा लोळू आणि मग कामाला सुरुवात करू.. असे सतत वाटते का..??
  • आज नको, उद्याच काहीतरी काम करू.. म्हणून कामाची टाळाटाळ होते का..??

ह्या सगळ्याचे उत्तर जर ‘हो’ असेल तर आपल्या मधली ‘लेझी मेरी’ लहानपणा पासून अजूनही आपल्याच सोबत आहे असे म्हणायला हरकत नाही..

पण हा लेझिनेस, हा आळस नकळत आपल्याला कामचुकार बनवत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही..

Advertisement

कधी कधी लक्षात तर येते, मात्र आळस इतका जास्त अंगात भिनलेला असतो, की त्यावर काहीही उपाययोजना करावीशी वाटत नाही…

सुट्टीचा एखादा दिवस मजेत घालवणे आणि रोजच सुट्टी लागल्यासारखे वागणे ह्यात फरक आहे..

Advertisement

आठवडाभरच्या कामातून थकवा घालवण्यासाठी एखादी सुट्टी घ्यावीच लागते.. त्या सुट्टीत भरपूर आराम करून नवीन ऊर्जा मिळवून पुन्हा पुढच्या आठवड्याचा कामाचा रथ ओढायला सज्ज होता येते..

मात्र ही सुट्टी, हा आराम वाढत गेला, तर शरीरात असलेली ऊर्जा सुद्धा निघून जाते.. आणि अंगात फक्त आळस भरतो.. जो आपल्याला सगळ्या कामांपासून दूर नेतो..

Advertisement

पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा आळस मुद्दाम आणलेला नसतो..

त्याच्या मागे काही कारणं असू शकतात. कधी कामातुन न मिळालेल्या उसंतीमुळे तर कधी कोणत्या ताणतणावामुळे मनाला, शरीराला खूपच थकवा येतो..

Advertisement

त्यामुळे काहीही न करता नुसते बसून राहवेसे वाटते.. कामांचा डोंगर दिसत असतो पण तो उचलायची इच्छाच रहात नाही…

म्हणजे नक्कीच काहीतरी गहन कारण असणार ह्या आळसामागे..!!

Advertisement
चला तर मग.. हा आळस पळवून आपली कार्यक्षमता वाढवायला काय करावे लागेल ते पाहू..

१. सगळ्यात आधी आपल्याला आळस का वाटतो त्याचे कारण शोधायला हवे:

तुम्हाला ५ दिवस काम केल्यावर २ दिवसांचा विकेंड आराम करायला पुरेसा असतो..

Advertisement

काहींना ६ दिवस काम करून एकच दिवसाची सुट्टी मिळते.. तोही विश्रांती घ्यायला पुरतोच.

मात्र स्वतःचा बिझनेस असणारी माणसे किंवा स्त्रियांना सहसा सुट्टीच नसते..

Advertisement

बिझनेस चे वेळापत्रक ऑफिस पेक्षा वेगळे असते. स्त्रियांना तर ऑफिसचे काम करून रोज घरचे काम असतेच..

आणि वीकेंडला सगळेच घरी असले की जास्तीचे काम पडते.. आणि काम हलके करायला कोणी येतही नाही..

Advertisement

त्यामुळे खूप लोकांना, अतिशय कष्ट पडल्यामुळे एखाद्या दिवशी कामाकडे ढुंकूनही पाहवेसे वाटत नाही..

इतके नकोसे होते काम की रोज नवीन बहाणे शोधावेसे वाटतात ते काम टाळायला.. मग हळू हळू त्यातून अंग काढून घ्यावेसे वाटते.

Advertisement

मात्र खूप काम करून नंतर त्या कामाला कायमचे बंद करण्यापेक्षा, वेळोवेळी शरीरास थोडा आराम दिलाच पाहिजे..

आराम करा, आऊटिंग्ज करा म्हणजे हा आळस दूर पळून जाईल.. मस्त फ्रेश होऊन नवीन वीक, नवीन कामांना सामोरे जा..

Advertisement

२. तुम्ही जे काम करताय ते तुमच्या आवडीचे आहे का नाही..??

आपण पैसे कमवायला नोकरी करतो, धंदा सुरू करतो.. बऱ्याचदा आपल्याला जे आवडते त्यातच आपण शिक्षण घेतो आणि त्याच क्षेत्रात काम सुरू करतो..

Advertisement

परंतु काही वर्षांनी त्या कामाचा कंटाळा यायला लागतो.. कधी कधी तर काम आवडीचेही नसते.. त्यामुळे ते करण्याची अजिबात इच्छा होत नाही..

माणूस सॅच्युरेट होतो.. त्याला सगळ्याच कामाचा आळस वाटायला लागतो.. पण असे होऊ देणे योग्य नाही..

Advertisement

जर तुम्हाला सध्याचे काम सोडून, जे आवडते त्यात बदली करून घेता येत असेल तर उत्तम.. पण काहींना ते शक्य नसते.. म्हणून छोटासा ब्रेक घ्या. स्वतःशी संवाद साधा..

आपण हे काम कोणत्या गरजांसाठी स्वीकारले आहे? त्या गरजा पूर्ण झाल्या का? किंवा आळसात दिवस घालवून ते ध्येय पूर्ण होईल का? ह्याचा विचार करा..

Advertisement

स्वतःला मोटीवेटेड ठेवा.. तरच तुमचे मन चार्ज होईल आणि आळस झटकून तुम्ही कामाला लागाल.

३. जे ‘काम’ करण्याचा आळस वाटतो आहे त्या कामाला सोप्पे करा:

Advertisement

आळसामागे कामाची व्याप्ती हे कारण असू शकते. खूप मोठे प्रोजेक्ट / टास्क आहे.. आणि त्यावर खूप काळ काम करावे लागणार आहे असे जाणवल्यास कधी कधी मन कच खाते..

मग अशा वेळी काय करावे..?? ते काम सोप्पे करावे..

Advertisement

आता गृहिणींचेच उदाहरण घ्या.. दिवसभर घरातली कामेच संपत नाहीत.. पण काही गृहिणी सगळी कामे स्मार्टली करतात.. जसे की, उद्याच्या अवघड मेनूची तयारी आदल्या दिवशी करून ठेवणे..

घरातल्या मुलांना काही जबाबदारी देऊन त्यांच्या कडून काम करवून घेणे. एखाद्या दिवशी सोपे स्वयंपाक काम करून धुणे, इस्त्री किंवा मसाले करून ठेवायचे काम उरकून घेणे.

Advertisement

असे कामाचे छोटे छोटे भाग पाडून ते संपवले तर त्या कामाचा कंटाळा येणार नाही.. अंगात आळस भरणार नाही..

म्हणून आपल्याकडच्या कोणत्याही कामाची विभागणी करावी.. टप्प्या टप्प्याने ते काम संपवावे.. काही वेळा भाडे तत्वावर मदतही घेण्यास हरकत नाही..

Advertisement

मी स्वतःसुद्धा मनाचेTalks च्या कामामधली गुणवत्ता जपली जावी, आणि चोहूबाजुंची कामं स्वतःच करून सगळंच निरस आणि कंटाळवाणं होणं टाळण्यासाठी एक वेळच्या उत्तम जेवणाची वेगळी सोय केली आहे.

कामाचा जास्तच बोजा ओढवून घेणं हे सुद्धा आळसाला आमंत्रण आहे.

Advertisement

प्रत्येक काम आपणच केले पाहिजे असेही नाही.. कामात अतिकष्ट घेऊन थकून जाण्यापेक्षा ते हुशारीने करण्याकडे भर द्यावा…

४. काही कामांमध्ये एक्सपर्ट्सची मदत घेणे गरजेचे असते:

Advertisement

एक सुट्टीचा रविवार असतो आणि घरातल्या कामांची यादी असते..

मात्र ही सगळी कामे तुम्हाला संपवायची असली तरी तुम्हालाच करायची असतात असे नाही..

Advertisement

जसे काही कामे डोमेस्टिक हेल्पर कडून करून घेता येतात.. जसे प्लम्बर, इलेक्ट्रिशिअन ह्यांना योग्य मोबदला देऊन ह्यांच्या कडून कामे करून घेता येतात..

कधी कुटुंबातील लहान मोठ्या सगळ्यांची एक टीम बनवून हसत खेळत काही कामे पार पाडता येतात..

Advertisement

फक्त एकमेकांना बक अप करता आले पाहिजे.. कारण मोटिवेशन असेल तर आपण मोठे मोठे पहाड हलवू शकतो..

काही कामे कायमच खूप बोरिंग वाटतात. त्यातून त्याची आवड नसेल तर अवघडच…

Advertisement

जसे दिवाळीची साफसफाई, पंखे साफ करणे, गवत कापणे, बाग काम, गाडी धुणे.. मग हे काम पूर्ण कसे करावे..?? दर वेळी हे आपले पुढच्या रविवारी करू म्हणून पुढेच ढकलले जाते.. ह्या कामांचा शत्रू म्हणजे आळस..

एकमेकांच्यात छोट्या स्पर्धा लावा, गाणी गुणगुणत कामे पूर्ण करा..

Advertisement

कधी घरातल्या गृहिणीला सुट्टी द्या आणि जेवण स्वतः बनवा किंवा बाहेरून मागवा.

सगळ्यांनी मिळून मजेने काम करायला घेतल्यावर कामाचा हुरूप येतो. अशा पद्धतीने कार्य करायची सवय केल्यास आळस फिरकणार सुद्धा नाही तुमच्याकडे..!!

Advertisement

५. आळस घालवायचा शेवटचा पर्याय म्हणजे स्वतःला समजावणे:

कधी कधी मदत मिळणे, कामगार मिळणे किंवा हवे तसे स्किल मिळणे अवघड असते ज्यात कदाचित फक्त तुम्हीच माहिर असता..

Advertisement

काही कामे फक्त स्वतःलाच येतात किंवा स्वतः केले तरच ते योग्य रितीने होऊ शकते..

मग अशा वेळी जर तुम्ही आळसात लोळत बसलात तर काम होईलच कसे..??

Advertisement

त्यामुळे अशा वेळी स्वतःला समजवायची वेळ येते.. जर आपल्याआरखे कोणीच काम परिपूर्ण करत नसेल तर करणार कोण..??

आणि कोणी केलेच तर ते आपल्याला आवडणार आहे का..?? हे समजवा स्वतःला.. किंबहुना ते काम करायला, स्वतःला भाग पाडा..

Advertisement

एकदा मनाजोगते काम पूर्ण झाले आणि सगळ्यांची वाहवा आली की, स्वतःचे कष्ट विसरूनच जातो आपण.. आणि आळस वाटण्याची चिन्हे रहात नाहीत..

म्हणूनच ती ‘म्हण’ प्रचलित आहेच..

Advertisement

कल करे सो आज कर..
आज करे सो अब..!!

आराम आणि आळसातला फरक समजला तर आपण ह्या म्हणीला समजू शकतो..

Advertisement

जो आळसात दिवस ढकलणार आहे, तो म्हणतो आता नको उद्या करतो.. आणि त्याचा ‘उद्या’ कधी येताच नाही..

मात्र ज्याला आयुष्यातले ध्येय साध्य करायची नशा आहे, जिद्द आहे तो म्हणतो ‘उद्या कशाला..?? मी आजच काम हाती घेतो.. किंबहुना आत्ताच, ह्या क्षणाला सुरुवात करतो..!!’

Advertisement

आणि मग अशी माणसे इतिहास घडवतात हे आपण जाणतोच.. चला तर मग मित्रांनो.. आळस झटकून कामाचा श्रीगणेशा करूया.. न जाणो आपल्या हातून ही काही उत्तम कार्य घडू शकते.. आपल्यालाही दुनियेची वाहवा मिळू शकते.. नाही का..!!

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here