शेवगाव19 तासांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
सध्या राज्यात दोन समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवण्यासाठी काही अदृश्य शक्ती काम करत आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेवगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. शेवगाव येथे रविवारी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जयंतीदरम्यान घडलेल्या दंगलीचा आढावा दानवे यांनी शनिवारी सकाळी घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. दानवे म्हणाले, गेल्या काही दिवसापासून राज्यात जाणीवपूर्वक अकोला, शेवगाव, बुलढाणा तसेच अन्य ठिकाणी हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवल्या गेल्या. समाजात भांडणे लावण्याचा प्रकार ही कार्यरत असणारी शक्ती तिला सरकारचे सहकार्य असून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचा आरोपही दानवे यांनी या वेळी केला.
Advertisement